ETV Bharat / state

Indigo Flight Open Emergency Door : इंडिगोच्या विमानात आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

author img

By

Published : Jan 29, 2023, 3:39 PM IST

Updated : Jan 29, 2023, 3:47 PM IST

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमान मुंबई विमानतळावर उतरत असतांना हा प्रकार घडला. प्रणव राऊत असे या प्रवाशाचे नाव आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न एका प्रवाशाने केला आहे. या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले असुम पुढील तपास सुरु आहे. प्रणव राऊत असे या प्रवाशाचे नाव आहे. विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याने विमानाला उपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असती. त्यामुळे विमानाचा उपघात होऊन प्रवाशांना जीव गमवावे लागले असते. या प्रवाशावर इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भदवी कलम 336 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न : इंडिगोचे विमान ( 6e 5274 ) 24 जानेवारीला सकाळी 11 च्या सुमारास बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मुंबईसाठी निघाले होते. दुपारी 12.30 च्या सुमारास विमान मुंबई विमानतळावर उतरत असतानाच कोणीतरी विमानाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केल्याचे वैमानिकाला समजले. केबिन क्रूने तात्काळ तपासणी केली असता इमर्जन्सी गेटच्या हँडलचे कव्हर उघडल्याचे समोर आले आहे.

मोठा अनर्थ टळला : सुदैवाने विमान उतरत असताना ही घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर या प्रवाशाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती इंडिगो विमान कंपनीने दिली आहे. याआधी इंडिगोच्या चेन्नई त्रीचिरपल्ली विमानात इमार्जन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाला होता.

एअर इंडियामध्ये लघुशंका - २६ नोव्हेंबर रोजी अमेरिकेहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI102 विमानात एका ७० वर्षीय महिला प्रवाशीवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघुशंका केली. त्या महिलेने या संदर्भात केबिन क्रू कडे तक्रार केली. त्यानंतर देखील त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत त्या महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले. या प्रकरणी शंकर मिश्रा याच्यावर भादंवि 354, 294, 509, 510 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शंकर मिश्राला दिल्ली पोलिसांनी अटक केली. एअर इंडियाने शंकर मिश्राला प्रवाशासाठी चार महिन्याची बंदी घातली होती.

तपास बंद - या प्रकरणी एअर इंडियाला ३० लाखांचा दंड व पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या कृतीवर आधारित अंतर्गत तपास बंद करण्यात आला आहे. डीजीसीएने कंपनीस सांगितलेल्या कार्यवाहीची दखल घेण्यात आल्याची माहिती एअर इंडिया प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - Bharat Jodo Yatra : अंतिम पड़ाव पर भारत जोड़ो यात्रा, राहुल ने लाल चौक पर फहराया तिरंगा

Last Updated : Jan 29, 2023, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.