ETV Bharat / state

'निवासी भागात हॉटेल, पब 24 तास सुरू ठेवण्यास विरोध'

author img

By

Published : Jan 17, 2020, 10:20 PM IST

मुंबईत दुकाने, मॉल, हॉटेल, पब 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. राज्य सरकार जर निवासी भागातील हॉटेल, पब सुरू ठेवून सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असेल. तर, आमचा त्याला कडाडून विरोध राहिल, असे भाजप नेते आमदार अ‌ॅड आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.

आशिष शेलार
आशिष शेलार

मुंबई - राज्य सरकार जर निवासी भागातील हॉटेल, पब सुरू ठेऊन सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असाल. तर, आमचा त्याला कडाडून विरोध असेल, असे भाजप नेते आमदार अ‌ॅड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

  • मुंबईत हाँटेल, बार, पब 24×7
    सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हाँटेल,पब 24×7 सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा कडाडून विरोध राहिल!

    — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईत दुकाने, मॉल, हॉटेल, पब 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. याबाबत भूमिका मांडताना भाजप नेते आमदार अ‌ॅड आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे. केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, मुंबईत हाँटेल, बार, पब 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे, ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण, निवासी भागात हॉटेल, पब 24 तास सुरू ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर, आमचा कडाडून विरोध राहिल.

हेही वाचा - 'सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट'

कायदा आणि सुव्यवस्थेसह स्थानिक नागरिकांची सुरक्षितता याचा विचार होणे अपेक्षित आहे. या निर्णयामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येणार असून असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत, असेही आमदार अ‌ॅड. शेलार म्हणाले.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला तब्बल 2 कोटी 89 लाखांचा खर्च, आरटीआयमधून उघड

दरम्यान, येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मॉल्स आणि मिलमधील हॉटेल्स, पब, बार 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार मध्यरात्री दीडपर्यंत बार सुरू ठेवण्याचा परवाना दिला आहे. अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

Intro:Body:
mh_mum_pub24x7_ashish_shelar_mumbai_7204684

निवासी भागात हाँटेल,पब 24×7 सुरु ठेवण्यास विरोध करु

-भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई:राज्य सरकार जर निवासी भागातील हाँटेल, पब सुरु ठेवून सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असेल तर आमचा त्याला कडाडून विरोध असेल, असे आज भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईत दुकाने, माँल, हाँटेल, पब 24×7
हे सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. याबाबत भूमिका मांडताना भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, मुंबईत हाँटेल, बार, पब 24×7
सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हाँटेल,पब 24×7 सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा कडाडून विरोध राहिल.
कायदा आणि सुव्यवस्थेसह स्थानिक नागरिकांची सुरक्षितता याचा विचार होणे अपेक्षित असून या निर्णयामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येणार असून या निर्णयामुळे असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत, असेही आमदार अँड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.