ETV Bharat / state

मुंबईत आणखी एका संशयित दशतवाद्याला अटक, एटीएसची कारवाई

author img

By

Published : Sep 30, 2021, 2:19 PM IST

याच प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दोन संशयित दहशवादी झाकीर हुसेन शेख आणि रिझवान मोमीन यांना ताब्यात दिल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच आज गुरुवारी पहाटे या प्रकरणात पुन्हा मोहम्मद इरफान रहमत अली शेख (50) याला अटक केली आहे. या संशयिताला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. शेख हा व्यवसायाने शिंपी आहे.

ats
एटीएस

मुंबई - दिल्ली पोलिसांनी भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा घाट उधळून लावला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. तपासादरम्यान महाराष्ट्र एटीएसने मुंबईमधून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आज गुरुवारी पहाटे आणखी एकाला वांद्रे परिसरातून ताब्यात घेतले आहे. मोहम्मद इरफान रहमत अली शेख (50) असे त्याचे नाव आहे. नागपाडा येथील एटीएसच्या कार्यालयात त्याला चौकशीसाठी त्याला आणण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी डाव उधळला -

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने १४ सप्टेंबरला सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या या संशयित दहशतवाद्यांमध्ये मुंबईचा रहिवासी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया, दिल्लीच्या जामिया नगरातील रहिवासी ओसामा उर्फ सामी, यूपीतील रायबरेलीचा रहिवासी मुलचंद उर्फ साधू, तसेच प्रयागराजमधील जिशान कमर, बहराइचा रहिवासी मोहम्मद अबू बकर आणि लखनऊचा राहणारा मोहम्मद आमिर जावेद यांचा समावेश आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असताना जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया याला रेल्वेचे तिकीट देणाऱ्या एजंटला एटीएसने ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले होते.

हेही वाचा - परमबीर सिंग मुख्य आरोपी असलेल्या गुन्ह्यातील दोघांना ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

इरफान शेखला अटक -

याच प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दोन संशयित दहशवादी झाकीर हुसेन शेख आणि रिझवान मोमीन यांना ताब्यात दिल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच आज गुरुवारी पहाटे या प्रकरणात पुन्हा मोहम्मद इरफान रहमत अली शेख (50) याला अटक केली आहे. या संशयिताला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. शेख हा व्यवसायाने शिंपी आहे. त्याच्या घरातून ४ लाख रुपये जप्त केले आहेत, जे दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येणार होते, त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून पैसे मिळाले होते ज्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत असे एटीएसकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.