ETV Bharat / state

Ravindra Chavhan: आनंदाचा शिधाचे वाटप आजपासून ऑफलाईन होणार - रविंद्र चव्हाण

author img

By

Published : Oct 23, 2022, 4:48 PM IST

दिवाळी सुरू झाली तरी अजून गोरगरिबांना सरकारचा आनंदाचा शिधा (anandacha shidha) मिळाला नाही. सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. (Anandacha shidha offline distribution)

रविंद्र चव्हाण, अन्न, नागरी व पुरवठा मंत्री
रविंद्र चव्हाण, अन्न, नागरी व पुरवठा मंत्री

मुंबई: दिवाळी सुरू झाली तरी अजून गोरगरिबांना सरकारचा आनंदाचा शिधा (anandacha shidha) मिळालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वाटप आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. (Anandacha shidha offline distribution). मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ व १ लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर मिळू शकतील, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण (ravindra chavhan) यांनी दिली.

रविंद्र चव्हाण, अन्न, नागरी व पुरवठा मंत्री

व्यवस्था संथगतीने सुरु: दिवाळीचा आनंदाचा शिधा अद्याप गोरगरीब जनतेपर्यंत पोहचला नसल्यामुळे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिवाळी सुरू झाली तरी अद्याप शिधा जनतेपर्यंत पोहचला नाही आहे, तर तो कधी पोहचणार असा सवाल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता
दिवाळीचा शिधाचे ऑनलाईन सोबत ऑफलाईन सुध्दा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू ऑनलाईन व्यवस्था थोड्या संथगतीने सुरु असल्यामुळे आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वाटप आता ऑफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. दिवाळीच्या निमित्ताने शिधा जिन्नस उपलब्ध करणे ही प्राधान्याची बाब असल्याने लवकरात लवकर जास्तीत जास्त पात्र शिधापत्रिकाधारकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचविण्याच्या सूचना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत. तसेच सर्व लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या रेशनिंग दुकानात जाऊन घ्यावा, असे आवाहनही रविंद्र चव्हाण यांनी केले आले.

माहिती सेल रजिस्टरमध्ये: विभागाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ऑनलाईन सुविधा सुरळीत सुरु आहे त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने वाटप करावे. तसेच ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीमुळे वेळ लागत आहे असे निदर्शनास येते तेथे आजपासून आनंदाची शिधा ही दिवाळी भेट ऑफलाईन पद्धतीने देण्यात यावी. ऑफलाईन पध्दतीने केलेल्या शिधा जिन्नस वाटपाची माहिती सेल रजिस्टरमध्ये प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने नोंदवायची आहे. तसेच नोंद घेतांना लाभधारकाचे नाव, शिधापत्रिकेचे शेवटचे चार अंक, मोबाईल क्रमांक, दिलेल्या शिधा जीन्नासचा तपशील, प्राप्त रक्कम (१०० रुपये) आणि लाभधाराकाची सही ह्या बाबी नमूद करावयाच्या आहेत. काही जिल्ह्यात सगळे शिधाजिन्नस पुरवठाधारकाकडून उपलब्ध झाले नसल्याचे निदर्शनास आले. मात्र काही जिन्नस लाभधारकाला दुकानात उपलब्ध आहे असे दिसून आल्यावर, जे उपलब्ध जिन्नस आहेत ते देण्यात यावे अशी मागणी होत आहे. या परिस्थितीत उपलब्ध जिन्नस लाभधारकाला देता येणार आहे. त्यामुळे लाभधारकाकडून मिळणारी रु. १०० ही सवलत रक्कम प्रथम टप्प्यात जमा करवून घ्यावी की संपूर्ण जिन्नस दिल्यावर, याबाबत दुकानदार निर्णय येईल, अशा सूचनाही मंत्री चव्हाण यांनी दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.