ETV Bharat / state

Ambadas Danve On Amit Shah: 'महाराष्ट्रद्वेषी' अमित शाहांच्या हस्ते 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' का देण्यात आला?

author img

By

Published : Apr 17, 2023, 7:27 PM IST

रविवारी (16 एप्रिल) पार पडलेला 'महाराष्ट्र भूषण' सोहळ्यात श्री सदस्यांना उष्माघातामुळे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे संतापले असून शासनाच्या धोरणावर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार खरंतर राज्यपालांच्या हस्ते दिला जातो. तो महाराष्ट्रद्वेषी अमित शाहंच्या हस्ते का दिला गेला? असा प्रश्न त्यांनी विचारला. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

Ambadas Danve On Amit Shah
अंबादास दानवे

अंबादास दानवे अमित शाहबद्दल बोलताना

नवी मुंबई: कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केला गेला होता. 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' हा राजभवनात दिला जातो. हा कार्यक्रम मैदानावर ठेवायला हरकत नव्हती; पण स्वतःच्या स्टेज पुरता निवारा शेड करता. मात्र, लाखो अनुयायांची काळजी घेतली जात नाही. या कार्यक्रमाला 15 ते 16 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर या लोकांना नीट पाणी, सावली, नाश्ता, जेवण राहण्यासाठी व्यवस्था करायला हवी होती. ट्राफिक मॅनेजमेंट व्यवस्थित करायला हवे होते. राज्य शासनामध्ये नियोजन करण्याची ताकत नव्हती तर या कार्यक्रमाचे आयोजन मैदानात करायला नको होते, असे अंबादास दानवे म्हणाले.


सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा: महाराष्ट्र भूषण पुरस्कार पाहण्यासाठी दूरदूरून लोकं आले होते; मात्र महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने नीट लक्ष न पुरवल्याने आणि योग्य नियोजन न केल्याने या सोहळ्यात सहभागी कित्येक लोक जखमी झाले. त्यांना उष्माघाताचा झटका आला तर काहीजण मृत्युमुखी पडले. याप्रकरणी सांस्कृतिक विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा, असेही दानवे म्हणाले.


सांस्कृतिक विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा: महाराष्ट्र भूषण सोहळ्याचे योग्य नियोजन न केल्याने सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी दानवेंनी केली. जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सेवेच्या माध्यमातून लोकं जमा केले; मात्र याचे काही लोक राजकीय भांडवल करत आहेत, असेही वक्तव्य दानवे यांनी केले.

अंबादास दानवे यांनी रुग्णालयाला भेट दिली: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील रुग्णालयाला भेट दिली. दानवे यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाच्या अधिकारी आणि सचिवांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच सांस्कृतिक विभागाच्या मंत्र्यांचा राजीनामा देखील मागितला आहे. रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळे सध्या या कार्यक्रमावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी देखील रात्री पीडितांची भेट घेतली.

हेही वाचा: Ajit Pawar BJP Alliance : महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न? अजित पवारांची भूमिका संशयास्पद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.