ETV Bharat / state

तब्बल २० दिवसानंतर अंधेरीतील बंद शाळा सुरु

author img

By

Published : Jul 26, 2019, 7:57 PM IST

शाळेने अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे महापालिकेने शाळेला नोटीस बजावली होती. या नोटिशीनंतर ही शाळा ३ आठवडे बंद होती. तसेच शाळेचे पाणी व वीज कनेक्शन कापण्यात आले होते. आता शाळा सुरू झाली.

बॉम्बे केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुल

मुंबई - अंधेरी येथील बॉम्बे केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल ही शाळा आज तब्बल २० दिवसांनंतर सुरू झाली आहे. शाळेने अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे महापालिकेने शाळेला नोटीस बजावली होती. या नोटिशीनंतर ही शाळा ३ आठवडे बंद होती. आज (शुक्रवार) महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेना आमदार अनिल परब यांनी आज शाळेला भेट दिली आणि शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करून शाळा तत्काळ सुरू केली.

तब्बल २० दिवसानंतर अंधेरीतील बंद शाळा सुरु

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून पालकांना संपूर्ण पाठिंबा देत शिवसेना संघटक कमलेश राय यांनी ५ दिवसांचे धरणे आंदोलन केले होते. शाळेसाठीच्या अग्निसुरक्षा नियमांची पूर्तता होण्यासाठी राय यांनी व्यक्तिशः प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले.

शाळेकडे अग्निशमन दलाचे 'ना हरकत प्रमाणपत्र' नव्हते. त्यामुळे शाळेवर कारवाई करण्यात येऊन शाळेचे पाणी व वीज कनेक्शन कापण्यात आले होते. मात्र, शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे २५०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखता आले, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

Intro:मुंबई - अंधेरी येथील बॉम्बे केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुल ही शाळा आज तब्बल 20 दिवसांनंतर सुरू झाली आहे. शाळेने अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे महापालिकेने शाळेला नोटीस बजावली होती. या नोटिसनंतर ही शाळा तीन आठवडे बंद होती.आज महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेना आमदार अनिल परब यांनी आज शाळेला भेट दिली आणि शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करून शाळा तत्काळ सुरू केली.Body:विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांना संपूर्ण पाठींबा देत शिवसेना संघटक कमलेश राय यांनी 5 दिवसांचे धरणे आंदोलन केले होते. शाळेसाठीच्या अग्निसुरक्षा नियमांची पूर्तता होण्यासाठी राय यांनी व्यक्तिशः प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले. Conclusion:शाळेकडे अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे शाळेवर कारवाई करण्यात येऊन शाळेचे पाणी- वीज कनेक्शन कापण्यात आले होते. मात्र शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे 25,00 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखता आले, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.