ETV Bharat / state

Aditya Thackeray On CM : 'आम्ही सत्तेवर आल्यावर मुंबई लुटणाऱ्या सर्वांना तुरुंगात टाकू', आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 5:30 PM IST

Aditya Thackeray On CM : 'आम्ही सत्तेवर आल्यावर मुंबई लुटणाऱ्या सर्वांना तुरुंगात टाकू', असं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. ते आज मातोश्रीवर पत्रकार परिषदेत बोलत होते.

Aditya Thackeray On CM
Aditya Thackeray On CM

मुंबई Aditya Thackeray On CM : आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध विकासकामांचं भूमिपूजन, लोकार्पण केलं जात आहे. या कामांवरून विरोधक सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत. त्यात आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पालिकेतील प्रशासकीय कमांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. 2021-22 मधील कामे अद्यापही सुरू झाली नाहीत. पालिकेतील भ्रष्टाचारावर आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन प्रश्न उपस्थित केला. 'पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही तुरुंगात टाकू' असा इशाराच आदित्य ठाकरे यांनी प्रशासनासह सरकारला दिला आहे.

पाकीट घेऊन काम करणारे कॉन्ट्रॅक्टर : माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "मागच्या जवळपास वर्षभरापासून आम्ही मुंबईसह राज्यातील रस्त्यांचा विषय सरकार समोर, मुंबई महानगरपालिकेसमोर मांडत आहोत. मुंबईत पाकीट घेऊन काम करणारे एकूण पाच कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यातील एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेशनची नोट गेली होती. त्या टर्मिनेशन नोटीसची मुदत दोन दिवसांपूर्वी 26 ऑक्टोबरला संपलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे संबंधित कंत्राटदारानं उत्तर दिलेलं नाही. या आठवड्यात महानगरपालिकेमध्ये त्यांची सुनावणी होणार आहे."


खोके घेऊन कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा काम : "महानगरपालिकेत होणाऱ्या या सुनावणीनंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होते, की त्याला पुन्हा एकदा पालिकेची कामं दिली जातात? हे आम्हाला बघायचं आहे. खोके घेऊन या कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा कामं देखील दिली जाऊ शकतात. त्यामुळं या सुनावणीकडं आम्ही सगळेच लक्ष ठेवून आहोत. हा विषय विधानभवनात देखील चर्चेला आला होता. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात, आम्ही मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करू असं म्हटलं होतं. ही रस्त्यांची कामं एक ऑक्टोबर ते 31 मे या काळात आम्ही पूर्ण करून देऊ, असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र, प्रत्यक्षात अजून एकाही कामाला सुरुवात झालेली नाही."

सरकारची मोठी जाहिरातबाजी : पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "सन 2021-22 च्या काळातील पालिकेची कामं अजूनही पडून आहेत. त्या कामांना सुरुवात झालेली नाही. जवळपास अडीच हजार कोटींची कामं पालिकेत पडून आहेत. यात या सरकारनं एक डाव आखला आहे. या कामाला वेळ लागण्याचं खापर वाहतूक पोलिसांवर फोडायचं. या कामांना मुंबईच्या वाहतूक पोलिसांची न मिळाल्याचं कारण पुढं देवून कामं राखडवणं हा त्यांचा डाव आहे. त्यासाठी एनओसी न देण्याचा वाहतूक पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मोठी जाहिरातबाजी करत तब्बल 6 हजार कोटींच्या कामांची घोषणा केली. त्यांची ती कामे देखील अद्याप पडून आहेत. या कामांना देखील सुरुवात झालेली नाही."

प्रदूषणावर कोणतेही निर्बंध नाहीत : "मुंबईत प्रदूषण वाढत आहे. त्याच्या बातम्या तुम्ही सर्वांनी दिल्यात. यावर उपाय म्हणून पालिकेनं सत्तावीस मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली. हीच मार्गदर्शक तत्व मार्च महिन्यात देखील पालिकेनं जाहीर केली होती. बांधकाम व्यवसायिकांवर निर्बंध आणले होते. त्यांच्या बांधकामाच्या ठिकाणाहून होणाऱ्या वायू प्रदूषणावर कोणतेही निर्बंध नाहीत. पालिकेच्या 24 पैकी 15 विभागांमध्ये वॉर्ड ऑफिसरच नाहीत. या जागांसाठी परीक्षा झाल्या आहेत. निकालही लागला, मात्र या सरकारनं खोक्यांसाठी अजूनही या जागांवर नियुक्त केलेल्या नाहीत." असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar : 'पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर सरकार गोंधळलेलं, भारतानं इस्रायलला कधीच पाठिंबा दिला नव्हता'; शरद पवारांची टीका
  2. Devendra Fadnavis : भाजपाच्या हँडलवर मी पुन्हा येणार असा व्हिडिओ टाकणे शुद्ध वेडेपणा; देवेंद्र फडणवीस यांची सारवासारव
  3. Sharad Pawar befitted reply to PM Narendra Modi : शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना सडेतोड प्रत्युत्तर, कृषीमंत्री असताना शेतीक्षेत्रातील प्रगतीचा वाचला पाढा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.