ETV Bharat / state

Action Against Joint Secretary : मंत्र्यांशी लबाडी अंगलट, सहसचिवावर कारवाई

author img

By

Published : Oct 1, 2022, 7:41 AM IST

नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सहसचिवाने नव्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा फायदा उठवण्याचा डाव ( Cheating with Ministers Ravindra Chavan ) आखला. मंत्री रविंद्र चव्हाण ( Minister Ravindra Chavan ) यांच्या निदर्शनास ही लबाडी येताच तात्काळ कारवाईचा बडगा ( Action against joint secretary ) उगरण्याचे आदेश दिले आहेत.

Action Against Joint Secretary
सहसचिवावर कारवाई

मुंबई - राज्यात सत्तांतर होताच मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी बदलीचे सत्र सुरू आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागात ( Food and Civil Supplies Department ) नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सहसचिवाने नव्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा फायदा उठवण्याचा डाव ( Cheating with Ministers Ravindra Chavan ) आखला. मंत्री रविंद्र चव्हाण ( Minister Ravindra Chavan ) यांच्या निदर्शनास ही लबाडी येताच तात्काळ कारवाईचा बडगा ( Action against joint secretary ) उगरण्याचे आदेश दिले आहेत



कारवाई करण्याचे आदेश - शिंदे फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्र्याने ( Shinde Fadnavis Cabinet ) काळाबाजार करणाऱ्या अधिकाऱ्याला झटका दिलाय. मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहसचिवाने हेतूपरस्परपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत अधिकाऱ्याची रवानगी मूळ विभागात करण्याचे आदेश चव्हाणांनी दिले आहेत. त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याचे आदेशही चव्हाण यांनी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना दिले आहेत. तसेच कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार विभागात खपवून घेतले जाणार नाही. विभागाचा कारभार हा पूर्णपणे स्वच्छ, पारदर्शक असला पाहिजे अशी तंबी दिली आहे.




अशी पकडली चोरी - राज्य शासनाने अंतिम केलेला निर्णय मान्यतेसाठी फाईल केवळ सोपस्कर म्हणून मंत्री चव्हाण यांच्या अवलोकनार्थ सादर केली. यावेळी मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन, त्यांना अंधारात ठेऊन तुंगार यांनी कृती केल्याचे उघड झाले. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या धान उत्पादक जिल्ह्यातील धानापासून तयार झालेल्या सि.एम.आर (तांदूळ) इतर जिल्ह्यांना उचल, वाटप करण्यासंदर्भातील आराखडा तयार करुन त्यास शासनाची मान्यता घेण्याचा २०२० मधील शासन निर्णय आहे. परंतु या प्रकरणामध्ये विभागाने या विषयाबाबतच्या फाईलवर मंत्री चव्हाण यांची मान्यता न घेता यासंदर्भातील परस्पर निर्णय सुधिर तुंगार यांनी घेतला. तसेच २० सप्टेंबर २०२२ च्या पत्रान्वये उचल वाटप करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.