ETV Bharat / state

Mumbai Crime : २० वर्षांपूर्वी पोलिसांनी गुंगारा देणाऱ्या सामूहिक हत्याकांडातील फरार आरोपीला अटक, मुंबई पोलिसांची कामगिरी

author img

By

Published : Jun 3, 2023, 6:43 PM IST

Mumbai Crime News
फरार आरोपीला अटक

मुंबई पोलिसांनी 20 वर्ष जुने हत्येचे गूढ उकलले आहे. 2003 मध्ये मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात कापड व्यापाऱ्याच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याला 20 वर्षांच्या प्रदीर्घ तपासानंतर अखेर अटक करण्यात आली आहे. परस्पर वादातून दीपक राठोड या कापड व्यापाऱ्याची त्याच्याच साथीदाराने हत्या केली होती. खून करून आरोपी फरार झाला होता. फरार आरोपी आपली ओळख बदलून अनेक राज्यात राहत होता.

माहिती देताना सहपोलीस आयुक्त

मुंबई: सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील २० वर्षापूर्वीचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीचे नाव रुपेश राय (वय 45) असे आहे. सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल नेस्ट, विलेपार्ले स्टेशन समोर 2 एप्रिल 2003 ते 3 एप्रिल 2003 दरम्यान दिपक उर्फ देवा मुन्नावर राठोड, वय २३ वर्षे हा कापड व्यवसायिकाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तब्बल 20 वर्षांनी 45 वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे.



अशी घडली घडली: तक्रारदार दिनकर विठ्ठल शेट्टी, हे हॉटेल नेस्ट या हॉटेलमध्ये रुम सहसबॉय म्हणून कामाला होते. या हॉटेलमध्ये 31 मार्च 2003 ला रूम क्रमांक १०८ मध्ये दोन इसम राहावयास आले होते. 3 एप्रिलला सकाळी १०.०० वाजता सदर रुमचा दरवाजा फिर्यादींनी ठोकुन पाहिला असता, कोणीही दरवाजा न उघडल्याने त्यांनी हॉटेल मॅनेजरला कळवून मास्टर कीने दरवाजा उघडला. तेथे बेडवर एक इसम चादर घेवुन झोपलेला आढळुन आला. त्यांनी त्यास हलवून उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो न उठल्याने त्याच्या अंगावरील चादर काढून पाहणी केली असता तो रक्ताच्या थारोळयात बेडवर मृतावस्थतेत आढळुन आला. परंतु त्याच्यासोबत आलेला त्याचा साथीदार मिळून आला नाही.

सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील २० वर्षापूर्वीचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. फरार आरोपी आपली ओळख बदलून अनेक राज्यात राहत होता. ही घटना 2 एप्रिल 2003 ची होती. आरोपीला ठाण्यात अटक केली आहे - सहपोलीस आयुक्त, सत्यनारायण चौधरी



खून करून फरार होता आरोपी: या गुन्हयातील मयत इसम हा गुन्हयातील अटक आरोपी याचे समवेत मुंबईत फिरण्याकरीता व कपडे खरेदीकरीता आला होता. अटक आरोपी हा मुळचा बिहार राज्यातील आहे. 2003 मध्ये खून केल्यानंतर तो पळुन गेला होता. गुन्हा नोंद केल्यानंतर पोलीस पथक त्याचा शोध घेण्याकरीता त्याचे मुळ गावी बिहार येथे गेले होते. परंतु तो त्याच्या गावी नव्हता. त्या नंतरही सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे पोलीस पथक १२ वेळा त्याचे मुळगावी गेले होते, परंतु आरोपीबाबत काहीही माहिती मिळून न आल्याने सदर गुन्ह्याचा तपास न्यायालयाचे परवानगीने तात्पुरता बंद करण्यात आला होता.



नाव बदलून राहता होता: त्यानंतर या गुन्हयाचे अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सांवत व गुन्हे प्रकटीकरण पथक हे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपीताचा शोध घेण्यासाठी मुझ्झफरनगर, राज्य बिहार येथे गेले होते. तेथील स्थानिक पोलीस ठाणे औराई, राज्य बिहार यांचे मदतीने आरोपीताचे नातेवाईकांच्या हालचालींवर निगराणी ठेवून तसेच तेथे केलेल्या गोपनीय तपासामध्ये आरोपी हा त्याचे मुळ नाव बदलून सध्या माजीवाडा, ठाणे येथील एका मिठाईच्या दुकानात काम करीत असल्याची माहिती मिळाली.

बॅगेतील रोख रक्कम केली लंपास: सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार जाधव व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी मिळालेल्या माहितीवरुन, सदर आरोपीस ताब्यात घेतले. पोलीस ठाणे येथे आणुन गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा मित्र दिपक राठोड यास बटर नाईफच्या सहाय्याने खून केला. त्याचा बॅगेतील रोख रक्कम 1लाख 30 हजार रुपये घेवुन बिहार राज्य येथे पळुन गेला. त्यानंतर पोलीस अटक करतील या भितीने तो त्याचे नाव बदलून मुळगावी न राहता वेगवेगळया ठिकाणी राहत होता.



यांनी केली कामगिरी: या गुन्ह्याचा तपास हा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग परमजीत सिंह दहिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ ९ कृष्ण कांत उपाध्याय, सहाय्यक पोलीस आयुक्त सांताक्रुज विभाग जयप्रकाश भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांताक्रुज पोलीस ठाणे राजेंद्र काणे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. Criminal Arrested Ulhasnagar पत्नीच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी 22 वर्षानंतर गजाआड
  2. Mumbai Crime 1990 पासून पोलिसांना देत होता गुंगारा 32 वर्षांनंतर आरोपीला शिताफीने केली अटक
  3. 1992 Riots दिंडोशी पोलिसांनी 1992 च्या दंगली मधील फरार आरोपीला केली अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.