ETV Bharat / state

Criminal Arrested Ulhasnagar : पत्नीच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी 22 वर्षानंतर गजाआड

author img

By

Published : Mar 7, 2022, 5:36 PM IST

पत्नीची हत्या करण्यात आल्यानंतर न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली होती. काही काळ जेलमध्ये राहिल्यावर आरोपी पॅरोलवर बाहेर आला. मात्र, तेव्हापासून तो फरार ( Accused Absconding Killing His Wife ) होता. अखेर उल्हासनगर गुन्हे शाखेने त्याला अटक केली ( Criminal Arrested Crime Branch Ulhasnagar ) आहे.

Criminal Arrested Ulhasnagar
Criminal Arrested Ulhasnagar

ठाणे - पत्नीच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला पती बडोदा जेलमधून पॅरोलवर १९९९ साली बाहेर आला. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत, तब्बल २२ वर्ष उल्हासनगर शहरात राहत ( Accused Absconding Killing His Wife ) होता. मात्र, गुन्हे शाखा पथकाला त्याची माहिती मिळताच आज ( सोमवार ) पहाटेच्या सुमारास त्याला अटक केली ( Criminal Arrested Crime Branch Ulhasnagar ) आहे. रमेश उर्फ दिनेश उत्तम तायडे ( वय ५३ ) असे अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे.

घरगुती वादातून पत्नीला जाळले जिवंत

आरोपी रमेश उर्फ दिनेश तायडे हा गुजरात राज्यातील सुरत शहरात पत्नीसह राहत होता. त्यातच १९९५ साली पती पत्नीमध्ये घरगुती वाद झाले होते. त्याच वादातून त्याने पत्नीला जिवंत जाळले. त्यावेळी सुरत शहरातील लिबांयत पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात भादवि. कलम ४९८(अ) ए, ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला अटक केली होती. त्यानंतर सुरत न्यायालयाने त्याला जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे. तेव्हापासून तो गुजरात राज्यातील बडोदा कारागृहात शिक्षा भोगत होता. पण, जेलमध्ये शिक्षा भोगत असताना त्याला २७ सप्टेंबर १९९९ रोजी पॅरोलवर रजा मिळाली होती. त्यानंतर रजा संपली तरी तो पुन्हा जेलमध्ये हजर न होता फरार झाला होता.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

२२ वर्षानंतर फरार कैदी पुन्हा जेलमध्ये

उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांना गुप्तहेरांकडून माहिती मिळाली की, पत्नीच्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला फरार आरोपी उल्हासनगर कॅम्प नंबर चार भागातील कानासाई रोड, भरतनगर येथे राहत आहे. तो स्वतःची ओळख लपवून एका खाजगी कंपनीत काम करत आहे. त्यामाहितीच्या आधारे आज ( सोमवार ) पहाटे चार वाजल्याच्या सुमारास सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत अटक केली. अटक केल्यानंतर कैद्याला आता बडोदा कारागृह जेलरशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.

हेही वाचा - Prasad Lad In High Court : पोलीस कारवाईपासून संरक्षण मिळावे; प्रसाद लाड यांची उच्च न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.