ETV Bharat / state

मुंबईत इस्टर्न फ्रीवेवर पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात, चालक गंभीर

author img

By

Published : May 31, 2020, 10:44 AM IST

ईस्टर्न फ्री वेवर पोलिसांच्या बोलेरो या गाडीचा टायर फुटल्यामुळे गाडी डिव्हायडरला धडकून ड्रायव्हर कडील बाजूस पडल्याने या गाडीचा वाहन चालक गंभीर जखमी झाला.

accident on eastern free way
मुंबईत इस्टर्न फ्रीवेवर भीषण अपघात

मुंबई- शहरातील ईस्टर्न फ्री वेवर शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास एका पोलीस वाहनाचा भीषण अपघात झाला. ठाणे लोहमार्ग पोलीस येथील पोलीस पथक हे भायखळा जेलमधील महिला आरोपीचा ताबा घेऊन पुन्हा ठाण्याला जात असताना ही घटना घडली.

ईस्टर्न फ्री वेवर बोलेरो या गाडीचा टायर फुटल्यामुळे गाडी डिव्हायडरला धडकून ड्रायव्हर कडील बाजूस पडल्याने या गाडीचा वाहन चालक गंभीर जखमी झाला. गाडीतील इतर चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींना जे. जे. हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. वाहन चालक गंभीर जखमी असून इतर किरकोळ जखमींना औषधोपचार करून सोडण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.