ETV Bharat / state

Aaditya Thackeray : एका ट्विटमुळं सरकारला कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा लागला, ही आमची ताकद - आदित्य ठाकरे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 7:24 PM IST

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पालिका कर्मचाऱ्यांचा बोनस (Diwali Bonus) का झाला नाही असा सवाल सरकारला केला. त्यांच्या ट्विटनंतर अवघ्या काही तासातंच सरकारने पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला. आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट करत सरकारला फटकारलं (Aaditya Thackeray on State Government) आहे.

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे

प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे

मुंबई Aaditya Thackeray : बुधवारी राज्य सरकारनं बेस्ट आणि बीएमसीमधील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस (Diwali Bonus) देण्याची घोषणा केली. याबाबत रात्री उशिरा पालिका कर्मचारी व राज्य सरकार यांच्यात बैठक पार पडली. यानंतर आज ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. माझ्या एका ट्विटनं राज्य सरकारला बैठक घ्यावी लागली आणि सरकारला पालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा लागला. घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलले होते की, आम्ही काँक्रीटचे रस्ते करु, मुंबईकरांना खड्डेमुक्त करु, या कामाची घाईघाईने ऑर्डर काढण्यात आली. पण अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. हे सरकार फक्त बोलत आहे, पण करत काही नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर (Aaditya Thackeray on State Government) केली.



1680 कोटी रुपयांच्या कामांचे कंत्राट रद्द : मुंबईतील ३१ मेपर्यंत ५० देखील रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत. रस्त्याबाबतच्या घोटाळ्याबाबत मी राज्यापालांना भेटलो. माझ्या एका ट्विटनं दक्षिण मुंबईतील रस्त्याचे 1680 कोटी रुपयांच्या कामांचे कंत्राट पालिका आयुक्तांनी रद्द केले. पालिका आयुक्तांनी तशी सही केली आहे. या रस्ते घोटाळ्यात चार कंत्राटदार दोषी आढळलेत, त्यांना काळ्या यादीत टाकलं जावं, अशी आमची मागणी आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.



...पण कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जातील का : पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, काम न होण्याची जबाबदारी कोणाची, 'आज कुछ तुफानी करते है...' असं म्हणत काम करण्याची आश्वासने देतात, पण कामं कुठेही सुरू झाली नाहीत. मुंबईत साधारण १ ऑक्टोबर ते ३१ मेपर्यंत रस्त्यांची कामं करण्याचा कालावधी आहे. अनेक आश्वासनं या सरकारने दिली आहेत, आमच्या भूमिकेमुळं बेस्ट आणि पालिका कर्माचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा झाली आहे. पण मुख्य प्रश्न हाच आहे की, त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.



आमचं सरकार आल्यावर त्यांना अटक करणार : आजही माझी आयुक्तांसोबत रस्त्यावर फिरण्याची तयारी आहे. पण कुठे कामे सुरू झालीत हे त्यांनी दाखवावे. मुंबईतील एक जबाबदार आमदार म्हणून माझी मुंबईत फिरण्याची तयारी आहे. आमचं सरकार येणार आहे, तसं वातावरण देखील आहे. मविआचे सरकार आल्यावर या घोटाळ्याची चौकशी करणार आणि जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करणार, त्यांना अटक करणार आहे. ज्यांनी खोके सरकारला पाठिंबा दिला आहे, त्यांनी पाठिंबा काढून दाखवावा असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला.



मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात : मुंबईत प्रदूषण वाढले आहे. प्रत्येकाला सर्दी, खोकला होत आहे. पर्यावरण खात्यातून यावर कोणी उत्तर देणार का, मुंबईत ज्या बिल्डिंगचं काम सुरू आहे, त्यातून ही धूळ येत आहे, यामुळं प्रदूषण होत आहे. कोणतेही नियोजन नाही, परिणामी मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. मुंबईचे पालकमंत्रीच बिल्डर आहेत, त्याबद्दल काय बोलावं, हिंमत असेल तर, बिल्डर आणि कांट्रॅक्टर यांचं काम थांबवून दाखवा असं आव्हान त्यांनी दिलं.

हेही वाचा -

  1. Aaditya Thackeray : गद्दारांचा गट असतो, आमचा पक्ष आहे; दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येनं लोक येणार - आदित्य ठाकरे
  2. Nitesh Rane : दसरा झाल्यावर अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडून जाणार; नितेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट
  3. Aditya Thackeray : "बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष कसे शोभतात?", आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.