ETV Bharat / state

Drugs Not Found From Aryan : आर्यन खान कडे ड्रग्स सापडतच नसल्याचा एसआयटीचा दावा

author img

By

Published : Mar 2, 2022, 11:42 AM IST

Updated : Mar 2, 2022, 12:06 PM IST

बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Shah Rukh Khan) कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी (Cordelia Drugs Party) प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं अटक केली होती. त्यानंतर एनसीबीने दिल्लीतील अधिकारांच्या नेतृत्वात एसआयटी पथकाची स्थापना करून या प्रकरणाचा तपास एसआयटी ला दिला होता. आर्यन कडे ड्रग्स सापडतच नसल्याचे (no drugs were found in Aryan Khan's possession) एनसीबी ने स्थापन केलेल्या एसआयटी ने अहवालात (A report by the SIT set up by the NCB) म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आर्यन खान

मुंबई: आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या सिंडिकेटचा भाग असल्याचा कोणताही पुरावा नाही आणि कॉर्डेलिया या पार्टीवर (Cordelia Drugs Party) टाकलेल्या छाप्यात अनेक अनियमितता झाल्या होत्या ज्या दरम्यान त्याला अटक करण्यात आली होती. असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपास पथका एसआयटीने अहवालात म्हटले आहे. कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर उठलेल्या राजकीय वादळा मुळे हे प्रकरण अख्या देशात गाजले. एनसीबी कडून करण्यात आलेली कारवाई संशयास्पद वाटल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक नेमण्यात आले. यात एसआयटीने धक्कादायक अहलवाल दिला आहे. या अहलवालानुसार आर्यन कडे त्यावेळी ड्रग्ज सापडलेच नव्हते. (no drugs were found in Aryan Khan's possession) त्यामुळे अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या भूमिकेवर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

वानखेडे आणि एनसीबीवर गंभीर आरोप
आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडलेच नाहीत तर मग त्याचा फोन ताब्यात घेऊन चॅटस का तपासण्यात आले असा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉर्डिलिया क्रुझवर धाड घातली तेव्हा एनसीबीच्या नियमांप्रमाणे त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले नव्हते असेही एसआयटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहे. असेही एसआयटीने म्हटले आहे. आर्यन खान याला अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला याप्रकरणात जाणीवपूर्वक गोवल्याचा आरोप करण्यात आला होता. बऱ्याच गदारोळानंतर एनसीबीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली होती. तसेच समीर वानखेडे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.

आर्यन 26 दिवस कारागृहात
एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. एनसीबीकडून या प्रकरणी आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 26 दिवसांनी आर्यन खान याची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता.

ते ड्रग्ज आर्यनसाठीच होते हे सिद्ध झाले नाही
या प्रकरणाबाबद एनसीबीने सांगितले की अरबाज मर्चंट याच्याकडे ड्रग्ज सापडले होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडून हे ड्रग्ज आले होते आणि आर्यन खान या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग आहे असा दावा देखील एनसीबीने केला होता. आता एनसीबीच्याच विशेष चौकशी समितीच्या तपासानंतर हे उघड झाले आहे की आर्यन खानकडे कोणतेही ड्रग नव्हते आणि त्याचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही. तसेच अरबाज मर्चंटकडे सापडलेले ड्रग्ज हे व्यावसायिक वापराच्या प्रमाणापेक्षा कमी होते तसेच ते आर्यन खानसाठीच होते हे देखील तपासात कुठेही सिद्ध झाले नाही.

समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यन खान वर केलेली कारवाई कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह काही सापडले नसल्याचा धक्कादायक खुलासा एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटी पथकाने चौकशी करुन तयार केलेल्या अहवालात तयार करण्यात आला आहे यात म्हटले आहे की, आर्यन वर करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात अनेक अनियमितता आढळून आल्याचे देखील अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

एनसीबीच्या आरोपात तथ्य नाही - उच्च न्यायालय
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. याप्रकरणात एनसीबीने आर्यन खान याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला होता. आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पाहिल्यास त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा या तिघांनी कोणतेही कट कारस्थान रचल्याचे त्यातून स्पष्ट होत नाही. याविषयीच्या एनसीबीच्या आरोपात तथ्य दिसत नाही असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले होते.

हेही वाचा : बाप बेट्याबरोबरच केंद्रिय संस्थांमधील वसुली एजंटही गजाआड जाणार - संजय राऊत

Last Updated : Mar 2, 2022, 12:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.