ETV Bharat / state

बोरिवलीत गजानन सोसायटीत भीषण आग; अग्निशमन दलाचा जवान जखमी

author img

By

Published : Sep 4, 2021, 1:42 PM IST

Updated : Sep 4, 2021, 3:56 PM IST

बोरिवली पश्चिम परिसरातील गजानन सोसायटीच्या सातव्या मजल्यावर अचानक आग लागली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. यात अग्निशमन जवान जखमी झाल्याचे समजते आहे.

mumbai
mumbai

मुंबई : बोरिवली पश्चिम परिसरातील गजानन सोसायटीच्या सातव्या मजल्यावर अचानक आग लागली. त्यामुळे सोसायटी कॅम्पसमध्ये खळबळ उडाली. घाईघाईत सोसायटीच्या लोकांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान 4 अग्निशमन गाड्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

बोरिवलीत गजानन सोसायटीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग

सातव्या मजल्यावर भीषण आग

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की 'सकाळी आग लागली. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील सुरक्षा केबिनमध्ये आग लागली. अग्निशमन दलाचे जवान सध्या आगीवर नियंत्रण मिळवत आहेत'.

बोरिवलीत गजानन सोसायटीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग

एक जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, एक अग्निशामक कर्मचारी जखमी झाला आहे. त्याला जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जखारिया कंपनीत स्फोट; एक ठार, पाच कामगार जखमी

Last Updated : Sep 4, 2021, 3:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.