ETV Bharat / state

बार्ज पी-305 दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला 70 वर

author img

By

Published : May 24, 2021, 11:01 AM IST

नौदलाकडून पी 305 बार्ज व टग बोट वरप्रदा या बुडालेल्या दोन बोटींवर खास ड्रायव्हर्सकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती.

बार्ज पी-305
बार्ज पी-305

मुंबई - तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या पी 305 बार्जवर बचाव व मदत कार्य अजूनही सुरू आहे. या बचाव कार्यादरम्यान पी 305 बार्जवर व टग वरप्रदा या दोन ठिकाणाहून आतापर्यंत 188 जणांचे प्राण वाचविण्यात आले असून 70 जणांचे शव नौदलाच्या हाती लागलेले आहेत. यातील 8 कर्मचाऱ्यांचे मृतदेह हे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी आढळून आले आहेत. तर आणखी 8 कर्मचाऱ्यांचे मृतदेह गुजरातमधील वलसाड येथे मिळून आले आहेत.

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी
या दुर्घटनेमध्ये 261 पैकी 70 कर्मचाऱ्यांचे शव मिळाले असून अजूनही बचाव व शोध मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 48 मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. इतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांची डीएनए चाचणी केली जात आहे. नौदलाकडून पी 305 बार्ज व टग बोट वरप्रदा या बुडालेल्या दोन बोटींवर खास ड्रायव्हर्सकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, पी 305वर शोधमोहीम पूर्ण झाली असून कुठलाही मृतदेह मिळून आलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.