ETV Bharat / state

राज्यात गेल्या २४ तासांत 56 हजार 286 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

author img

By

Published : Apr 8, 2021, 9:38 PM IST

गेल्या 24 तासांत राज्यात 56 हजार 286 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यावरून राज्यातील कोरोनाच्या भयावह परिस्थितीचा अंदाज येईल. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आज 376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona Maharashtra Review
कोरोना महाराष्ट्र आढावा

मुंबई - गेल्या 24 तासांत राज्यात 56 हजार 286 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यावरून राज्यातील कोरोनाच्या भयावह परिस्थितीचा अंदाज येईल. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आज 376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.77 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती

हेही वाचा - मंदिरे बंद असल्याने रेल्वेला मोठा फटका; शिर्डीसह पंढपूरच्या विशेष गाड्या रद्द

राज्यात गेल्या 24 तासांत 36 हजार 130 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 26 लाख 49 हजार 757 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 32 लाख 29 हजार 547 कोरोना रुग्णांची नोंद आहे, तसेच एकूण सक्रिय रुग्ण 5 लाख 21 हजार 317 इतके आहेत.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 8,938
ठाणे- 899
ठाणे मनपा- 2001
नवी मुंबई- 1,056
कल्याण डोंबिवली- 1,310
उल्हासनगर- 186
मीरा भाईंदर- 403
पालघर - 308
वसई विरार मनपा - 481
रायगड - 448
पनवेल मनपा - 513
नाशिक - 1,585
नाशिक मनपा - 1799
अहमदनगर - 1,585
अहमदनगर मनपा - 639
धुळे- 465
धुळे मनपा - 253
जळगाव - 1126
जळगाव मनपा - 116
नंदुरबार - 582
पुणे - 2,690
पुणे मनपा - 7054
पिंपरी चिंचवड - 2,315
सोलापूर - 563
सोलापूर मनपा - 297
सातारा - 642
कोल्हापूर - 112
सांगली - 312
औरंगाबाद मनपा - 810
औरंगाबाद - 401
जालना - 817
हिंगोली - 255
परभणी - 409
परभणी मनपा - 318
लातूर - 354
उस्मानाबाद - 362
बीड -746
नांदेड मनपा - 506
नांदेड - 841
अकोला मनपा - 113
अमरावती मनपा - 284
यवतमाळ - 293
बुलडाणा - 883
वाशिम - 207
नागपूर - 2,491
नागपूर मनपा - 3,439
वर्धा - 441
भंडारा - 1044
गोंदिया - 549
चंद्रपूर - 434
चंद्रपूर मनपा - 131

हेही वाचा - कोरोनामुळे 17 लाख 77 हजार मुंबईकर 'बंदीस्त'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.