ETV Bharat / state

Electric Vehicles On Airport : मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळाच्या ताफ्यात ४५ इलेक्ट्रिक वेईकल्‍स

author img

By

Published : Jan 25, 2023, 8:02 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सीएसएमआयएने आज आपल्या ताफ्यात ४५ इलेक्ट्रिक वेईकल्‍स दाखल केली आहेत. कार्बन उत्सर्जन कमी व्हावे आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी ही योजना आखण्यात आली आहे यात आणखी 60 वाहने वाढवण्यात येणार आहेत.(Chhatrapati Shivaji Maharaj International Airport)

विमानतळावर इलेक्ट्रिक वाहने
Electric Vehicles On Airport

मुंबई: ग्लोबल वॉर्मिगमुळे जगभरात पर्यावरण रक्षणावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून विमान सेवेत आघाडीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच सीएसएमआयए ने आपल्या ताफ्यात ४५ इलेक्ट्रिक वेईकल्‍स आणली आहेत. २०२९ पर्यंत त्याच्या नेट झिरो मिशनचा भाग म्हणून सर्व इंधन-शक्तीवर चालणारी वाहने इलेक्ट्रिक वाहनांसह बदलण्याचा मानस असल्याचे सीएसएमआयए ने सांगितले आहे.

विमानतळावर इलेक्ट्रिक वाहने
Electric Vehicles On Airport

आणखी ६० ईव्‍ही तैनात करणार : सीएसएमआयएच्या ऑपरेशनल नेट झिरो योजनेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्याचा उद्देश विमानतळाचा पर्यावरणावर होणारा प्रभाव कमी करण्‍याचा आहे. जानेवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या ४५ ईव्‍हींव्यतिरिक्त, सीएसएमआयए पुढील आर्थिक वर्षात आणखी ६० ईव्‍ही तैनात करण्‍याची योजना आखत आहे, ज्‍यामध्‍ये रुग्णवाहिका, फॉरवर्ड कमांड पोस्ट, सुरक्षा व एअरसाइड ऑपरेशन्स आणि मेन्‍टेनन्‍स यूटिलिटी वाहनांचा समावेश आहे. उर्वरित वाहने टप्प्याटप्प्याने बदलण्यात येतील. सीएसएमआयए २०२९ पर्यंत सीएसएमआयएच्या नेट झीरोचे समर्थन करण्याकरिता इलेक्ट्रिक वेईकल्‍सला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी विमानतळावर कार्यरत भागधारकांना सहभागी करण्याची योजना आखण्यात येत आहे.



कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत : विमानतळाने सुरू केलेल्या प्रत्येक हरित उपक्रमामुळे पर्यावरण, सामाजिक व प्रशासन (ईएसजी) धोरण कटिबद्धतेअंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे संकेत देणारे महत्त्वाचे टप्पे गाठणे हा मोठा सन्मान आहे. एक जबाबदार विमानतळ सेवा प्रदाता म्हणून सीएसएमआयए पर्यावरणावरील आपला प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करते. इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब केल्‍याने कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल, ज्यामुळे विमानतळाचा कार्बन फूटप्रिंट कमी होईल. कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने आपला प्रवास जलद मार्गी लावण्यासाठी केंद्रीत असलेली इकोसिस्टम तयार करण्याचा दृष्टीकोन आणि ध्येयाचा सीएसएमआयएला अभिमान वाटतो.


फास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन्‍स : विमानतळाने टर्मिनल १ वर पी १ - मल्टी लेव्हल कार पार्किंग (एमएलसीपी), टर्मिनल २ वर पी५ - एमएलसीपी आणि सीएसएमआयएच्या एअरसाइडवर बारा प्रबळ डीसी फास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन्‍स सुरू केले आहेत. हा उपक्रम गतीशीलतेमध्ये जीवाश्म इंधन जाळल्यामुळे जवळपास २५ टक्‍के हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यामध्‍ये मदत करेल. तसेच, विमानतळावर आता एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल (एसीआय) च्‍या एअरपोर्ट कार्बन एक्रिडेशन (एसीए) प्रोग्रामचा हायेस्‍ट-लेव्‍हल ४+ ‘ट्रान्झिशन’ आहे. सीएसएमआयए पर्यावरणावर होणारा प्रभाव कमी करण्‍याप्रती कटिबद्ध आहे असे विमानतळ प्रशासनाने कळविले आहे.

Scan Boarding Pass : मुंबई विमानतळावर तिकीट बोर्डिंग पास स्कॅन होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.