ETV Bharat / state

विशेष : मुंबईत गेल्यावर्षी ३८४१ आगीच्या घटना, १०० जणांचा मृत्यू तर २९८ जखमी

author img

By

Published : Oct 22, 2021, 11:53 PM IST

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे आगीबाबतची आकडेवारी मागवली होती. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीमधून ही आकडेवारी समोर आल्याचे शेख यांनी सांगितले. अग्निशमन दलाकडून याआधी २००८ ते २०१८ या दहा वर्षात किती आगीच्या घटना घडल्या याचीही माहिती मागवली होती. या दहा वर्षाच्या काळात गेल्या २००८ ते २०१८ या दहा वर्षांच्या कालावधीत ४८ हजार ४३४ आगी लागण्याच्या घटना नोंद झाल्या आहेत.

3841 fire incident happens in mumbai is 2020
मुंबईत गेल्यावर्षी ३८४१ आगीच्या घटना

मुंबई - मुंबईमध्ये जागोजागी उंच इमारती बांधल्या जातात. अशा उंच इमारती बांधताना त्यामध्ये सुरक्षा आणि आगीपासून वाचण्यासाठी यंत्रणा कार्यरत नसतात. यामुळे सामान्य नागरिकांचा जीव जातो. गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये एकूण ३८४१ आगीच्या घटना नोंद झाल्या. त्यात १०० जणांचा मृत्यू झाला. तर २९८ लोक जखमी झाले, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिल्याचे आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी सांगितले. महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम-२००६ च्या अंमलबजावणी का करत नाही? असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला आहे.

दहा वर्षात ४८ हजार ४३४ आगीच्या घटना -

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे आगीबाबतची आकडेवारी मागवली होती. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीमधून ही आकडेवारी समोर आल्याचे शेख यांनी सांगितले. अग्निशमन दलाकडून याआधी २००८ ते २०१८ या दहा वर्षात किती आगीच्या घटना घडल्या याचीही माहिती मागवली होती. या दहा वर्षाच्या काळात गेल्या २००८ ते २०१८ या दहा वर्षांच्या कालावधीत ४८ हजार ४३४ आगी लागण्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. त्यात १५६८ गगनचुंबी इमारतीचा समवेश आहे. तसेच ८७३७ रहिवाशी इमारतीत आग लागली आहे. तसेच ३८३३ व्यासायिक इमारतीत आग लागली आहे. ३१५१ झोपडपंट्ट्यांमध्येही आग लागली आहे.

हेही वाचा - फोन टॅपिंग प्रकरण : सीबीआय प्रमुख सुबोध जयस्वालांकडून मुंबई पोलिसांच्या समन्सला प्रतिसाद

सर्वाधिक आगी शॉक सर्किटमुळे -

गेल्या दहा वर्षात ज्या आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक आगी या शॉक सर्किटमुळे लागल्या आहेत. या काळात ३२ हजार ५१६ आगी या शॉक सर्किटमुळे लागल्या आहेत. १११६ आगी या गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागल्या आहेत. तर ११ हजार ८८९ आग या अन्य कारणामुळे लागल्या आहेत. दहा वर्षाच्या कालावधीत एकूण ६०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात २१२ पुरुष व २१२ महिलांचा तसेच २९ मुलांचा समावेश आहे. आगीच्या घटनेत ८९ कोटी ४ लाख ८६ हजार १०२ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, अशी माहिती दिल्याचे शेख यांनी सांगितले.

अग्निप्रतिबंधक अधिनियमाची अंमलबजावणी करा -

मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन दल अधिकारी महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम-२००६ च्या अंमलबजावणी का करत नाही ? अजूनही आग दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असे प्रश्न शकील शेख यांनी उपस्थित केले आहेत. यासंदर्भात मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांना पत्र पाठवून या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची मागणी शकील शेख यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.