ETV Bharat / state

१०० कलाकारांच्या सामूहिक प्रयत्नातून प्रभू श्रीरामाचं ४० फूट कटआउट तयार, नागपूरच्या कलाकारांची किमया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 9:27 PM IST

Lord Ram Cutout : नागपूरच्या मूर्तिकार, पेंटिंग आर्टिस्ट आणि इतर कलावंतांच्या सामूहिक प्रयत्नातून रामाचं ४० फूट उंच असं भव्य कटआउट तयार करण्यात आलंय. (40 foot cutout) हे श्रीरामाचं कटआउट नजरेस पडल्यानंतर जणू सजीव रूपात श्रीरामच दृष्टीस पडल्याचा भास झाल्याशिवाय राहणारच नाही. सजीव रंग कलावंतांनी या कटआउटमध्ये भरले आहेत. सलग आठ दिवसांच्या अपार मेहनतीनंतर ४० फुटांचं भव्य कटआउट तयार झालं आहे.

Lord Ram Cutout
नागपूरच्या कलाकारांची किमया
श्रीरामाच्या कटआउटविषयी माहिती देताना कलावंत राजीव पाखले

नागपूर Lord Ram Cutout : 100 कलावंतांकडून प्रभू श्रीरामांचं ४ भागातील हे कटआउट तयार करण्यात आलेत. आज सर्व भाग एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. जेव्हा २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना सुरू असेल त्यावेळी भव्य कटआउट नागपूरकरांना बघायला मिळणार आहे. (Ram Mandir celebration)

गोळीबार चौकात उभारले जाणार कटआउट: गोळीबार चौकाच्या अगदी मध्यभागी श्रीरामाचं भव्य कटआउट लावलं जाणार आहे. त्यासाठी १०० पेक्षा जास्त कलावंत हे दिवसरात्र झटले असून त्यांची आता ही मेहनत फळाला आली आहे. श्रीरामाच्या कटआउटमध्ये जे रंग भरलेले आहेत ते वॉटर कलर आहेत. त्यांची एकमेकांशी रंगसंगती जुळणं फारचं अवघड असल्याचं या कलावंतांनी सांगितलं. मात्र, श्रीरामाच्या श्रद्धेमुळे सर्व रंगसंगती सजीव रूपात जुळून आली असल्याची भावना या कलावंतांनी व्यक्त केली आहे.

नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन: तब्बल ५०० वर्षानंतर श्रीरामांचं आगमन होत असल्यानं नागपूर 'श्रीरामाच्या' नामात तल्लीन झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. जिकडे-तिकडे श्रीरामाची भक्ती आणि जयघोष सुरू आहे. कुठे रांगोळ्या काढून रामाचं स्वागत केलं जातं आहे तर कुठे मेहंदी कलाकार स्त्रियांच्या हातावर रामायणातील प्रसंगांची पोट्रेट मेहंदी साकारत आहेत. या माध्यमातून हे कलावंत आपल्या श्रीराम भक्तीचा परिचय देत आहेत. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तर राम मंदिरासाठी जगातील सर्वांत मोठी कढई तयार केली आहे. आज या कढईची मिरवणूक काढली जाणार आहे.

१००१ लोकांच्या हातावर श्रीरामाचं टॅटू: कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचं आणि आस्थेचं प्रमुख केंद्र असलेल्या प्रभू श्रीरामाचं अयोध्येत मंदिर निर्माण कार्य पूर्णात्वास येत आहे. येत्या २२ जानेवारी रोजी श्रीराम हे मंदिरात विराजमान होणार आहेत. त्यामुळेचं संपूर्ण भारतात उत्सव अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. इथे प्रत्येकाला जाणे शक्य नाही. त्यामुळे श्रीरामाचा हा उत्सव ज्याला जमेल तसा साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरातील एका २२ वर्षीय तरुणाने देखील हा उत्सव अतिशय वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा निश्चय केला आहे. रितिक राजेंद्र दरोडे नामक टॅटू कलाकारानं अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे या आनंदात १००१ लोकांच्या हातावर नि:शुल्क 'श्रीराम' गोंदवण्याचा संकल्प केला आहे. गेल्या २० दिवसात त्याने तब्बल ९०० पेक्षा अधिक लोकांच्या हातावर श्रीराम नावाचा टॅटू काढला आहे.

हेही वाचा:

  1. राम मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी, बिहारमधून एकाला अटक; छोटा शकील असल्याचा दावा
  2. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
  3. गौरी लंकेश हत्येत आरएसएसवर आरोप केल्याप्रकरणी मानहानीचा खटला, राहुल गांधींना न्यायालयानं ठोठावला ५०० रूपयांचा दंड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.