ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: माझ्याच बाबतीत अपवादात्मक नियम का? रूपाली चाकणकरांचा शरद पवारांना सवाल

author img

By

Published : Jul 6, 2023, 10:45 PM IST

मी महिला आयोगाची अध्यक्ष असताना महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही. या कारणाने माझा राजीनामा घेतला. गेली दीड वर्ष मी पक्षाच्या व्यासपीठापासून दूर होते, हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे आल्यामुळे माझ्या कामाला गती मिळेल असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. त्या आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होत्या.

Maharashtra Political Crisis
चाकणकर

महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून रूपाली चाकणकरांचा शरद पवारांना प्रश्न

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra Political Crisis) अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना (Rupali Chakankar question to Sharad Pawar) अजित पवार यांनी महिला प्रदेशाध्यक्षपद दिले. यानंतर त्या आज पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी महिला संबंधी सुरक्षा आणि झालेल्या कारवाई संदर्भात आढावा घेतला. तसेच काही सूचनाही केल्या. (Chairperson of Women Commission)

तर मीच महिला अध्यक्षपदी राहणार: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच कोल्हापुरात आल्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना मी यापूर्वी अनेकदा येथे येऊन गेले; मात्र महिला आयोगाची अध्यक्षा आणि पक्षाची महिला अध्यक्ष असताना मी येथे पहिल्यांदाच आले आहे. 2019 ला मी पक्षाची महिला अध्यक्ष असताना अडीच वर्षे हा पदभार मोठ्या ताकदीने सांभाळला महिलांना मोठ्या संख्येने गोळा केले. मात्र कालांतराने काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे मला या पदाचा राजीनामा द्यावा लागला; मात्र आता अजितदादांनी पुन्हा महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने पूर्वीच्या कामाचा अनुभव आणि आयोगाचा अनुभव चांगल्या पद्धतीने उपयोगी पडेल. यामुळे 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रावादीच्या मतदानाचा टक्का वाढलेला असेल आणि तोही राष्ट्रवादीच्या महिला संघटनमुळे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच अजित पवार उपमुख्यमंत्री असल्याने माझ्या कामाला गती मिळेल आणि कार्यकाळ संपेपर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकनकरच असेल असेही त्या म्हणाल्या.



माझ्याच बाबतीत हा अपवादात्मक नियम का?: आजही शरद पवार माझे दैवत आहेत. संघटनेमध्ये काम करत असताना मी अनेक पद भूषवले. मी महिला अध्यक्ष असताना देखील त्यांनी मला महिला आयोगाच्या अध्यक्षा केल्या. ज्याच्यामुळे पक्षाची ताकत वाढेल. मात्र महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही, असे म्हणून माझा राजीनामा घेतला गेला. घरावर तुळशीपत्र ठेवून वाड्यावर जाऊन, लोकांमध्ये जाऊन मी संघटना वाढवली आणि त्यांनी माझा राजीनामा घेतला. संघटना ही मला घरासारखी आहे. यापूर्वीचे सर्व अध्यक्ष दोन-दोन पदांवर काम करत होते. मग मला असा वेगळा का नियम लावला गेला असा सवालही त्यांनी शरद पवार यांना विचारला आहे. गेल्या पंधरा महिन्यात मला पक्षाच्या एकाही कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले नाही. की काही व्यासपीठावर मला जाता आले नाही. तर गेल्या दीड वर्षांत माझं काय चुकलं हे देखील पक्षातील वरिष्ठ महिला नेत्यांनी मला बोलावून सांगितल नाही, असे म्हणत नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावरही रूपाली चाकणकर यांनी टीका केली. तर या सर्व गोष्टींमुळे मी अजित पवार यांच्यासोबत गेले आणि त्यांनी मला महिला प्रदेशाध्यक्ष पद दिले. यामुळे मी पुन्हा पक्षाच्या व्यासपीठावर दिसले. आम्ही पक्ष बदललेला नाही. शाहूृ-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पक्षांचे विचारधारा घेऊनच आम्ही काम करत आहोत असे त्या यावेळी म्हणाल्या.


दहा-बारा वर्षांपूर्वीचा तो फोटो व्हायरल: भाजप महिला अध्यक्षा चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल वाद हा काय नवा नाही. दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी एक क्षण देखील सोडत नाहीत. अगदी उर्फी जावेदच्या मुद्द्यापासून ते राजकीय मुद्द्यापर्यंत एकमेकांवर टीका केली गेली. मात्र आता या दोन्ही नेत्या एकत्र आल्याने एकत्र काम कसे करणार? असा सवाल प्रत्येकाला पडला आहे. याबाबत बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, यापूर्वी आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो तेव्हा शिवसेनेच्या महिला नेत्या, काँग्रेसच्या महिला नेत्या देखील होत्या. नेते एकत्र काम करत असताना आम्ही आमची विचारधारा आणि कार्यकर्त्याला सोबत घेऊनच काम करतो. त्यांच्या झेंड्याखाली जाऊन आम्ही काम करत नाही. राष्ट्रवादीमध्ये दहा-बारा वर्षांपूर्वीचा आमचा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल केले. असे फोटो व्हायरल केल्याने घर चालत असतील तर ते चालू द्या, असे त्या म्हणाल्या.


तर यावर चर्चा करू: राज्यात दररोज वेगवेगळ्या राजकीय घटना घडत असून आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबतच्या चर्चाही झाल्याचे समोर येत असून याबाबत रूपाली चाकणकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, कोणाकडे कसे पाहावे हा प्रश्नच आहे. कोणा-कोणाला एकत्र यायचे आणि विचार पुढे घेऊन जायचे आहेत तो त्यांचा प्रश्न आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर यावर चर्चा करू. याबाबतच्या चर्चा त्यांना करू द्या, अशी मिश्किल प्रतिक्रिया यावेळी चाकणकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.