ETV Bharat / state

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मांगुर येथे साचले पाणी, वाहतूक बंद

author img

By

Published : Jul 23, 2021, 11:10 AM IST

Updated : Jul 23, 2021, 12:31 PM IST

दक्षिण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक नद्यांचे पाणी हे सध्या पात्राबाहेर आल्यामुळे महापुराचे परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांचे पाणी सध्या पात्राबाहेर आले आहे.

water came on pune bengluru national highway near mangur kolhapur
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मांगुर येथे पाणी

कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मांगुर फाटा येथे दूधगंगा नदीचे पाणी आले आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही बाजूकडून वाहतूक ठप्प झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

दक्षिण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक नद्यांचे पाणी हे सध्या पात्राबाहेर आल्यामुळे महापुराचे परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांचे पाणी सध्या पात्राबाहेर आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास बारा नद्या वाहतात. त्यापैकी दूधगंगा-वेदगंगा या दोन्ही नद्यांचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मांगुर फाट्याजवळ पुराचे पाणी जवळपास दोन फूट इतके आहे. यामुळे याठिकाणी जवळपास दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. त्यात मोठे ट्रक, कंटेनर, बसेस आणि खासगी वाहनेदेखील आहेत.

हेही वाचा - Kolhapur Flood Drone Video: पाहा कोल्हा'पूर', पंचगंगेचे रौद्ररूप

Last Updated : Jul 23, 2021, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.