ETV Bharat / state

Tripurari Poornima 2022 : हजारो पणत्यांनी उजळून निघाला पंचगंगा नदी घाट; त्रिपुरारी पौर्णिमा साजरी

author img

By

Published : Nov 8, 2022, 3:19 PM IST

कोल्हापुरातील पंचगंगा नदीचा घाट आज पहाटे पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला. कोल्हापुरातील विविध सामाजिक सेवा संस्था आणि नागरिकांच्यावतीने दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त (Tripurari Poornima celebrated) पंचगंगा नदी घाटावर हजारो पणत्या प्रज्वलीत (Panchganga river ghat with Panati) करुन; आनंद साजरा केला जातो. (Tripurari Poornima 2022)

Tripurari Poornima 2022
त्रिपुरारी पौर्णिमा साजरी

कोल्हापूर : कोल्हापुरातील विविध सामाजिक सेवा संस्था आणि नागरिकांच्यावतीने दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त (Tripurari Poornima celebrated) पंचगंगा नदी घाटावर हजारो पणत्या प्रज्वलीत (Panchganga river ghat with Panati) करुन; आनंद साजरा केला जातो. बोचरी थंडी असतानाही मिन मिनत्या हजारो पणत्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरकर दरवर्षी पंचगंगा घाटावर मोठी गर्दी करत असतात. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे तो उत्साह साजरा करता आला नाही. मात्र आज मोठ्या उत्साहात हा दीपोत्सव साजरा पार पडला. काल सोमवारी सायंकाळपासून याची तयारी सुरू होती. (Tripurari Poornima 2022)

प्रतिक्रिया देतांना नागरिक


दीपोत्सवाची परंपरा कायम : त्रिपुरारी पौर्णिमेच्या पहाटे गेल्या बावीस वर्षांहून अधिक काळ पंचगंगा घाटावर दीपोत्सव साजरा केला जातो. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आठवडाभर दीपोत्सवाची तयारी करत असतात. दीपोत्सवाच्या सुरवातीला पंचगंगा घाट परिसरामध्ये विविधरंगी आणि मनमोहक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. काही रंगोळ्यांमधून सामाजिक संदेश सुद्धा देण्यात आले. पणत्या प्रज्वलीत केल्यानंतर घाटावर फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. बघता बघता संपूर्ण पंचगंगा नदी घाट परिसर हजारो पणत्यांनी उजळून निघाला.


जुन्या शिवाजी पुलावर लेसर प्रकाश : गेल्या काही वर्षांपासून येथील ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंटवरून जुन्या शिवाजी पुलावर विविध रंगांचे लेसरचा प्रकाश पाडला जातो. त्यामुळे या दीपोत्सवाला एक वेगळाच साज चढवला जातो. यावर्षी सुद्धा आशा पद्धतीने विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्रिपुरारी पौर्णिमेच्या या दीपोत्सवाचा अत्युच्च क्षण डोळ्यात साठवण्यासाठी कोल्हापूरकर पंचगंगा घाटावर गर्दी करत असतात. विशेषतः तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात दीपोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित असतात. पहिल्यांदाच हा सोहळा अनुभवण्यासाठी अनेकजण यावर्षी पंचगंगा घाटावर दाखल झाले होते. सुमारे दोन तासांहून जास्त काळ प्रकाशाचा हा खेळ पंचगंगा घाट परिसरात अनुभवयाला मिळाला. काल रात्री पासून घाटावर दीपोत्सव तयारीला सुरुवात झाली होती आणि पहाटे तीन वाजता दीपोत्सव पार पडला. (Tripurari Poornima 2022)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.