ETV Bharat / state

Historic victory of the farmers : देशातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय; शेट्टींची प्रतिक्रिया, केले मोदी सरकारचे अभिनंदन

author img

By

Published : Nov 19, 2021, 10:54 AM IST

Updated : Nov 19, 2021, 12:20 PM IST

देशातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा ऐतिहासिक विजय आहे, (Historic victory of the farmers) अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिली आहे. कृषी कायदे मागे (Repeal of agricultural laws) घेतल्यानंतर शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. उशिरा का होईना सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला त्याबद्दल मोदी सरकारचे (Congratulations to Modi Government) अभिनंदन सुद्धा शेट्टी यांनी केले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
राजू शेट्टी

कोल्हापूर : देशातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा ऐतिहासिक विजय आहे, (Historic victory of the farmers) अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिली आहे. कृषी कायदे मागे (Repeal of agricultural laws) घेतल्यानंतर शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. उशिरा का होईना सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला त्याबद्दल मोदी सरकारचे (Congratulations to Modi Government) अभिनंदन सुद्धा शेट्टी यांनी केले. दरम्यान, आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधताना तीनही कृषी कायदे रद्द (All three agricultural laws repealed) करणार असल्याची घोषणा केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी

संसदेत मंजूर झालेले कायदे शेतकरी मागे घ्यायला भाग पाडू शकतो :

यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राजू शेट्टी म्हणाले, येत्या 25 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सीमेवर सुरू (Farmers' agitation on the border of Delhi) असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. वर्षभर शेतकऱ्यांनी हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले. जरी संसदेत बहुमत असले तरी शेतकऱ्यांनी आम्हाला हे कायदे मान्य नाहीत ही भूमिका घेतली आणि लढा दिला त्याचा हा विजय आहे. हा एक ऐतिहासिक विजय (Historic victory) आहे. शिवाय सरकारने सुद्धा देशातील शेतकऱ्यांची काय नेमकी मागणी आहे याचा विचार केला त्याबद्दल सुद्धा सरकारचे अभिनंदन करतो अशीही प्रतिक्रिया शेट्टी यांनी व्यक्त केली.

आंदोलन म्हणजे युद्ध नाही :

यावेळी पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, वर्षभर आंदोलन सुरू आहे. मात्र जय पराजय व्हाययला आंदोलन म्हणजे युद्ध नसते. मात्र सरकारने सुद्धा त्यांच्या मागण्यांचा विचार केला आणि हे कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे याबद्दल सरकारचे तसेच मोदींचे अभिनंदन असेही त्यांनी म्हंटले.

हेही वाचा - PM Modi Address To Nation : तीनही कृषीकायदे रद्द होणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

Last Updated : Nov 19, 2021, 12:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.