ETV Bharat / state

KCR on Kolhapur Sangli Visit: केसीआर उद्या कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर; शेतकरी संघटनेचा 'हा' नेता बीआरएसच्या वाटेवर

author img

By

Published : Jul 31, 2023, 2:04 PM IST

तेलंगणा राज्यामध्ये सलग दोन वेळा सत्ता काबीज केल्यानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राकडे मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. ते महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश देखील केलेला आहे. उद्या के चंद्रशेखर राव हे कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील हे बीआरएसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

KCR on Kolhapur and Sangli Visit
के चंद्रशेखर राव

बी जे पाटील यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव उद्या कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे. ते बीआरएसचा विस्तार महाराष्ट्रात करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. वेळोवेळी महाराष्ट्र दौरे आयोजित करत आहेत. यासाठी त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांना बीआरएमध्ये प्रवेश देखील दिले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएसकडून जोरदार तयारी सुरु आहे.


29 जुलै रोजी आमची के चंद्रशेखर राव यांच्यासोबत बैठक पार पडली. यामध्ये शेतकरी प्रश्नांसह विविध मागण्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या. सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्याने आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते उद्या कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर येणार आहेत. दुपारचे भोजन देखील ते आमच्यासोबत करणार आहेत. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. यावेळी आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत.- रघुनाथ पाटील, अध्यक्ष: शेतकरी संघटना


पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्राकडे कुच : तेलंगणामध्ये सलग दोन वेळा के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या माध्यमातून एक हाती सत्ता मिळवली. यानंतर त्यांना आपल्या पक्षाचा देशात विस्तार करण्याचे वेध लागले आहेत. यामुळेच के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती केले. आता त्यांनी आपला मोर्चा संपूर्ण देशाकडे वळवला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलंगणानंतर त्यांनी पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्राकडे कुच केले आहे.

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना ऑफर : गेल्या काही महिन्यात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली होती. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्यासह भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांचा समावेश होता. या सर्वांनी ही ऑफर धुडकावली होती. मात्र रघुनाथ पाटील यांनी 29 जुलै रोजी हैदराबाद येथे के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांच्यात मॅरेथॉन बैठक पार पडली. यामध्ये शेतकरी मागण्यांसह साखर कारखाने आणि इथेनॉल यावर चर्चा झाली आहे. रघुनाथ पाटील यांच्या सर्व मागण्या के चंद्रशेखर राव यांनी मान्य केल्यामुळे ते बीआरएसला पाठिंबा देणार आहेत.

हेही वाचा :

  1. BSR : 'या' कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदार संघात बीआरएसचा उमेदवार ठरला; माजी आमदाराची लेक उतरणार मैदानात
  2. Sharad Pawar on KCR: केसीआर यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात ताफ्याने शक्तीप्रदर्शन...शरद पवारांनी लगावला टोला
  3. K Chandrasekhar Rao : भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव विठ्ठल चरणी लीन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.