राजू शेट्टींचा पुन्हा एल्गार; अंतिम बिलापोटी शेतकऱ्यांना 400 जादा द्या, अन्यथा....

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Aug 24, 2023, 10:13 PM IST

Raju Shetty

कर्नाटकने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर अंतिम बिलाबोटी राज्यातील शेतकऱ्यांना 400 रुपये जादा मिळावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) 13 सप्टेंबर रोजी कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

कोल्हापूर : शेतकरी प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Saghtana) आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार न केल्यास यंदाच्या गळीत हंगामातील कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा : जागतिक बाजारात साखरेचा भाव वाढत चालले आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करता एफआरपी निश्चित झालेली होती. दोन वर्षपासून आम्ही ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करा अशी मागणी लावून धरली आहे. एफआरपी प्रमाणे उसाला दर मिळाला पाहिजे. घाई-गडबडीत महिन्याभरपूर्वी सरकारने ऊस दर नियंत्रण समिती स्थापन केली, मात्र अजून 2021-22 चा हिशोब झालेला नाही. हा सरळ सरळ राज्य सरकारचा गलथानंपणा आहे. केंद्राकडून मिळालेल्या एफआरपी मधून कारखान्यांना अतिरिक्त निधी मिळाला आहे. यातून शेतकऱ्यांना अंतिम बिलापोटी किमान 400 रुपये द्यावेत ही मागणी घेऊन, 13 सप्टेंबरला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

कर्नाटकने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर अंतिम बिलाबोटी राज्यातील शेतकऱ्यांना 400 रुपये जादा मिळावेत. शेतकऱ्यांना अंतिम बिलापोटी 13 सप्टेंबरला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार. - राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेउत्पादन खर्च 22 टक्क्यांनी वाढला : रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च 22 टक्के वाढला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने खतांच्या किंमतीवर का नियंत्रण ठेवले नाही असा सवाल उपस्थित केला आहे. साखर कारखान्यांकडे असलेल्या अतिरिक्त निधींमधून शेतकऱ्याला अंतिम बिलापोटी चारशे रुपयांची रक्कम द्यावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.


इंडिया आघाडीशी संबंध तोडले : राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात स्थापन झालेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीशी कोणताही संबंध नाही. इंडिया आघाडीशी संबंध तोडले आहेत. एमएसपी नाही तर वोट नाही अशी भूमिका आम्ही घेतली आहे. सर्व पिकांना हमी भाव मिळाला पाहिजे, आता फक्त 23 पिकांना हमीभाव मिळतो. या शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन प्रागतिक मंचच्या माध्यमातून 2024 ची लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा -

  1. Raju Shetty: भारत राष्ट्र समितीकडून मला मुख्यमंत्री पदाची ऑफर; माजी खासदार राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट
  2. Raju Shetty: जूनच्या पहिल्या रविवारी नांगरट साहित्य संमेलन कोल्हापूरात होणार - माजी खासदार राजू शेट्टी
  3. Raju Shetty on Modi : मोदींनी जग पाहिले, आता आपला देश फिरून पाहावा; राजू शेट्टींचा खोचक टोला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.