ETV Bharat / state

Kolhapur Swabhimani Agitation : संतप्त स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवला सतेज पाटलांचा ताफा

author img

By

Published : Mar 6, 2022, 8:54 PM IST

Updated : Mar 6, 2022, 9:14 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी गेल्या १३ दिवसांपासून कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. जिल्ह्यात धरणे आंदोलनाबरोबर, चक्का जाम, सरकारी कार्यालयात साप सोडणे यासारखे आंदोलन केल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना आज काळे झेंडे दाखवित गाड्यांचा ताफा अडविण्यात आला.

ताफा अडवताना स्वाभिमानी कार्यकर्ते
ताफा अडवताना स्वाभिमानी कार्यकर्ते

कोल्हापूर - शेतीपंपाला दिवसा १० तास वीज द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी गेल्या १३ दिवसांपासून कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. परंतु या आंदोलनाकडे महाविकास आघाडीचे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे सांगत आक्रमक स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी आज (रविवारी) पालकमंत्री सतेज पाटील यांना हातकंणगलेत काळे झेंडे दाखवले. शिवाय कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवत निदर्शन केले.

मंत्री सतेज पाटील यांचा ताफा अडवताना स्वाभिमानीचे कार्यकर्ते

अन्यायी वीज बील वसुली थांबवावे व शेतीपंपाचे चुकीची वीज बिल तातडीने दुरूस्त करावेत, या मागणीसाठी २२ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. गेल्या १३ दिवसांत सरकारकडून कोणतीच विचारणा करण्यात आलेली नसल्याचे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात धरणे आंदोलनाबरोबर, चक्का जाम, सरकारी कार्यालयात साप सोडणे यासारखे आंदोलन केल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना आज काळे झेंडे दाखवित गाड्यांचा ताफा अडविण्यात आला. 13 दिवसात पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, दोन आमदार हे आंदोलन स्थळी येऊन राजू शेट्टी यांची भेट देऊन गेले. मात्र यावर काही तोडगा निघाला नाही. यावेळी पालकमंत्र्यांनी गाडी थांबवून कार्यकत्यांचे म्हणने ऐकून घेतले. दोन दिवसात बैठक लावण्याची आश्वासन दिले. दरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी शासनाने तातडीने याबाबत निर्णय न घेतल्यास येथून पुढे मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा - Minister Prajakt Tanpure : 'अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शेजारी बसले म्हणजे सरकार स्थापन होत नाही'

Last Updated : Mar 6, 2022, 9:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.