ETV Bharat / state

Aadhar Card Found in Panchaganga River: कोल्हापुरातील पंचगंगेत पोते भरून आधारकार्ड! वाचा नेमका काय प्रकार ?

author img

By

Published : Feb 13, 2023, 5:02 PM IST

कोल्हापुरातील पंचगंगा नदीमध्ये पोते भरून आधारकार्ड सापडले आहेत. राष्ट्रीय सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना पंचगंगा नदीच्या घाटावर स्वच्छता मोहिम सुरू असताना हे आधारकार्ड सापडलेले आहेत. पोलीस घटनस्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Aadhar Card Found in Panchaganga River
पंचगंगा नदीच्या घाटावर आधारकार्ड आढळून आले

पंचगंगा नदीच्या घाटावर आधारकार्ड आढळून आले

कोल्हापूर: पंचगंगा नदीमध्ये पोते भरून आधारकार्ड सापडल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील इचलकरंजी येथील पंचगंगा नदी घाटावर स्वच्छ्ता मोहीम सुरू असताना हा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना हजारो जणांचे आधारकार्ड आणि काही कागदपत्रांनी भरलेले पोते सापडले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यामधील आधार कार्ड हे ओरिजनल असल्याने याचा कोणी गैरवापर केला आहे का? याची शंका आता उपस्थित केली जात आहे. आधारकार्डचे पोते असल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करत सर्व आधार कार्ड ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे.

काय आहे प्रकरण: इचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी रेशन कार्डने भरलेले पोते नदीत टाकल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा आधार कार्डने भरलेले एक पोते पुन्हा मिळून आले आहे. काल, रविवारी नदी घाटावर राष्ट्रीय सेवा दल यांच्याकडून घाट स्वच्छता मोहीम सुरू असताना नदी काठावर एक पोते तरंगत असल्याचे युवकांना दिसून आले. हे पोत बाहेर काढून उघडले असता पोत्यामध्ये हजारो आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे निदर्शनास पडले.

पोलिसांनी केली तपासणी: एवढी महत्वाची आणि पोते भरून कागदपत्रे नदीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना कळवताच शिवाजीनगरचे सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी पथकासह धाव घेतली. चिखलमय पोत्यातून आधार कार्ड बाहेर काढून त्याचा पंचनामा केला गेला. यावेळी घटनास्थळी काही आधार कार्ड काढणाऱ्या केंद्रप्रमुखांना बोलवले आणि त्यांनी सुद्धा आधारकार्डची तपासणी केली. यामध्ये काही आधार कार्ड बोगस असल्याचे तर काही आधारकार्ड खरी असल्याचे सांगितले.


आधारकार्ड स्थानिक इचलकरंजीकरांचीच: नदीमध्ये सापडलेली सर्व आधारकार्ड इचलकरंजी शहरातील जवाहरनगर, भोने माळ, कोरोची, कबनूर आदी भागातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची ही आधार कार्डे असल्याचे आढळून आले आहे. यापैकी काहींशी संपर्क करण्यात आला. अनेकांनी खरी आधार कार्डे घरीच असल्याचे पोलिसांना सांगितले. या आधार कार्ड मध्ये छेडछाड करून निराधार लोकांना आधार कार्ड मध्ये वयोमर्यादा वाढवून देऊन हे बोगस आधार कार्ड काढण्यात आले असल्याची शंका आता निर्माण होऊ लागली आहे. दरम्यान, आता शिवाजी नगर पोलिसांनी पंचनामा करून ही सर्व आधार कार्ड जप्त केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

आधार कार्डचा दुरुपयोग ? : गेल्या काही दिवसांपूर्वी नदीकाटा शेजारी असणाऱ्या रस्त्यालगत तीन पोती बोगस रेशन कार्डची आढळली होती. सध्या इचलकरंजी शहरातील आधारकार्ड केंद्र, सायबर कॅफेमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि सरकारी कार्यालायातील महत्त्वाची कागदपत्रे काढून दिली जातात. पण नागरिकांकडून ओरिजनल घेऊन त्याचे फोटो काढून त्याचा दुरुपयोग करायचा प्रकार इचलकरंजी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणत होऊ लागल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी कठोर पावले उचलत त्वरित अश्या केंद्रांवर कारवाई कारवाई अशी मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा : Shirdi News : साईबाबांच्या चरणी 30 लाखांचा नवरत्न हार अर्पण; चांदीचे ताट, ग्लास, प्लेट यांचाही समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.