ETV Bharat / state

Sanjay Raut In Kolhapur : 'ताजमहल फोडण्यापेक्षा हिंमत असेल तर चीनच्या ताब्यात...'; संजय राऊतांचे भाजपला आव्हान

author img

By

Published : May 29, 2022, 11:06 PM IST

भाजपने ताजमहल फोडून त्यातील शिवलिंग काढण्यापेक्षा चीनच्या ताब्यात असलेली मानस सरोवर घेऊन दाखवावे, असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. ते कोल्हापूरातील कागलमध्ये बोलत ( sanjay raut criticized bjp ) होते.

Sanjay Raut
Sanjay Raut

कोल्हापूर - उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा पासून भाजपच्या नेत्यांना झोप लागत नाही. ते रोज उठून सरकार पाडण्याची नवीन तारीख जाहीर करत आहेत. मात्र, त्यांना हे कळत नाही की भाजपचे नशीबच फुटक आहे. भाजपने ताजमहल फोडून त्यातील शिवलिंग काढण्यापेक्षा चीनच्या ताब्यात असलेली मानस सरोवर घेऊन दाखवावे, असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले ( sanjay raut criticized bjp ) आहे. ते कोल्हापूरातील कागलमध्ये बोलत होते.

'दुसऱ्यांचे आमदार फुटण्यापेक्षा तुमचं नशिब फुटल आहे' - संजय राऊत म्हणाले की, अत्यंत खेळीमेळीत महाविकास आघाडीचे काम सुरू आहे. सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार हे शाहू महाराजांच्या विचार घेऊन चालणारे सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्या पासून भाजप रोज सरकार पाडण्याचे नवीन तारीख जाहीर करत आहे. विरोधी पक्षाला गेली अडीच वर्ष झोप लागत नाहीत. विरोधी पक्षाला कळतच नाहीय नेमकं काय चाललं आहे. दुसऱ्यांचे आमदार फुटण्यापेक्षा तुमचं नशिब फुटलं आहे. महाराष्ट्रात भाजपचं राज्य कधीच येणार नाही.

'आम्ही संभाजीराजेंना फसवलं नाही' - भाजपचे नेते शिवसेनेवर आरोप करत आहेत की संभाजीराजे यांना शिवसेनेनं फसवलं. मात्र, 2019 मध्ये भाजपने आम्हाला फसवल तेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बोली भाषेपासून दिलेला शब्द त्यांनी मोडला. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसले त्याबद्दल त्यांनी बोलावं. मी शाहू महाराजांना भेटलो. राज्य शाहू महाराजांच्या विचारांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून चालवत आहे, असेही राऊतांनी म्हटले.

संजय राऊत सभेला संबोधित करताना

'भाजपने ताजमहाल फोडण्यापेक्षा...' - काश्मीर मध्ये गेल्या 3 महिन्यांत 54 हमले झाले, तर 17 काश्मिरी पंडितांची हत्या झाली. गेल्या महिन्यात राहुल भट या काश्मीर पंडिताची हत्या झाली. तेव्हा स्वतःला हिंदूंचे कैवारी समजणारे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री कुठे आहेत. भाजपचे हिंदुत्व फक्त वाराणसी ज्ञानव्यापी मंदिरा पुरतेच आहे का?. भाजपला महागाई बद्दल विचारले असता काही बोलत नाहीत. मात्र, ताजमहाल खाली शिवलिंग असल्याचे बोलतात. ताजमहाल फोडण्यापेक्षा चीनच्या ताब्यात असलेले आणि देवांचे देव महादेव यांचे घर असलेले कैलास मानसरोवर ताब्यात घ्या. तुमच्यात हे करून दाखवण्याचे हिंमत आहे का?, असा सवालही राऊतांनी विचारला आहे.

'भाजपचा प्रवास राम पासून औरंगजेबापर्यंत' - गेल्या काही दिवसांपासून बाबरी कोणी पाडली यावर वाद रंगला आहे. आम्ही भाजप सारखे बाबरी पडली तेव्हा पळून गेलो नाही. बाबरी पडली तेव्हा फक्त एक जण उभे होते ते म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. सध्या भाजपचा प्रवास हा राम ते औरंगजेब असं सुरू आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी भाजप कडून पीयूश गोयल आणि डाॅ. अनिल बोंडेंना उमेदवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.