ETV Bharat / state

Sanjay Raut on Shinde Group: अलीबाबा आणि चाळीस चोर हे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

author img

By

Published : Mar 2, 2023, 7:03 AM IST

खासदार संजय राऊत यांनी शिवगर्जना मेळाव्यातून पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला. चंद्रदीप नरकेसह अलीबाबा आणि चाळीस चोर हे टेस्ट ट्यूब बेबी आहेत असे संजय राऊत म्हटले. स्मशानात जाताना 50 खोके नेणार आहात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut
संजय राऊत

चाळीस चोर म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी

कोल्हापूर : संजय पवार महाराष्ट्राला शिवसेनेवरच्या निष्ठेसाठी माहीत आहेत. आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे. माझ्या आयुष्यातील 40 वर्ष शिवसेनेसोबत गेली. आज माजी ओळख आहे, ती शिवसेना या चार शब्दांमुळे, असे म्हणत टेस्ट ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्ला चढवला. माणसाला जगायला किती पैसे लागतात? स्मशानात जाताना 50 खोके नेणार आहात का? असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.


50 खोके घेऊन जाणार का : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शिवगर्जना यात्रेनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याबद्दल ते सर्व शिवसैनिक जिल्हाप्रमुख व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. विरोधकांवर जोरदार हल्ला करत आहेत. संकट कोणावर येत नाहीत ते सर्वांवरच येत असतं. असे असले तरी माणसाला जगायला किती पैसे लागतो? स्मशानात जाताना तुम्ही 50 खोके घेऊन जाणार आहात का? असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. दारूच्या धुंदीत हे सर्व आमदार गद्दारी करत सुरतला गेले. त्यानंतर गुवाहाटीला गेले. मात्र त्यांना गुवाहाटीला जायची काय गरज होती? देवी तर कोल्हापुरात पण होती. आख्ख जग अंबाबाई देवीसमोर झुकत मात्र देवी चुकीच्या माणसावर कधी प्रसन्न होत नाही. मात्र आता गुलाबराव यांच्या तोंडातून अखेर खरे बाहेर आलेच आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठीच गद्दारी केली ते बोलून दाखवले हे ही त्यांनी नाईंटी मारली म्हणून बाहेर आली असेल असे संजय राऊत म्हणाले.

गुवाहाटीला जाऊन रेड्यांचा बळी : गुवाहाटीला जाऊन रेड्यांचा बळी दिला जातो. आमचे 40 रेडे तिकडे गेले. मात्र, काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात कनेरी मठात 52 गाई मेल्या. यावर हिंदुत्ववादी म्हणून घेणारी कमळाबाई आणि शिंदे गटातील नेते कोणी का काही बोलत नाही. पालघरमध्ये झालेला साधू हत्याकांड आणि कणेरी मठातील गाईंची हत्या हे एक समान आहेत. त्यांना गाईचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा शाप लागेल असे संजय राऊत म्हणाले आहेत.


गाईचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा शाप : कोल्हापूरची भूमी परिवर्तन करणारी भूमी आहे. बाळासाहेबांची महानता मोठी होती. हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेबांनी माकडाची माणसे केली, माणसांचे सरदार केले आणि यातील काहींनी खंजीर खुपसला. या लोकांनी आपल्या आईला विकले. जे महाराष्ट्र आणि शिवसैनिक विसरणार नाही. ते पुढे म्हणाले की, संजय राऊत संपूर्ण देशाला माहीत आहेत हे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे तसेच भाजपला सत्तेचा दरवाजा उघडून देणारे देखील बाळासाहेब ठाकरे होते. दिशा देण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. याच शिवसेनेचे चिन्ह गद्दारांनी चोरले. नावावर देखील दरोडा टाकला.


दादा कोंडकेंचे सिनेमे पहा : हक्क भंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप व शिंदे गटाकडून करण्यात आली. याबाबत देखील त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्यूत्तर दिले. मी सकाळी अलीबाबा आणि 40 चोर यांना चोर मंडळ म्हणल आणि तिकडे अधिवेशनात माझ्यानावाने बोंबाबोब करत अधिवेशन बंद पाडल. माझ्यावर हक्क भंगाची कारवाई करण्यात येत आहे. मात्र मी काय म्हणतो ते समजून घ्या आणि समजत नसेल तर दादा कोंडकेंचे सिनेमे पहा असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.



अलीबाबा आणि त्याचे 40 चोर टेस्ट ट्यूब बेबी : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपूर्वी करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. तसेच मी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या नावावरच आगामी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याबाबत संजय राऊत बोलताना म्हणाले की चंद्रदीप नरके हे टेस्ट ट्यूब बेबी आहेत. त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. एकनाथ शिंदे म्हणजेच अलीबाबा आणि त्याचे 40 चोर हे देखील टेस्ट ट्यूब बेबी असून एकाच्याही तोंडावर तेज नाही. राधानगरी विधानसभा मतदारसंघ आबिटकरला आंबट करायचा आहे. शिंदे गटाचे खासदार मंडलिक आता मंडप झाले असून धैर्यशील माने हा तर बोलका पोपट निघाला असे म्हणत कोल्हापुरातील शिंदे गटात गेलेले आमदार व माजी आमदार यांची त्यांनी खिल्ली उडवली.

हेही वाचा :Kasba Chinchwad Bypoll Results : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाची तयारी पूर्ण; कोण उधळणार गुलाल?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.