ETV Bharat / state

संभाजीराजे यांनी वाहिली जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली; जुन्या आठवणींना दिला उजाळा, पाहा PHOTO

author img

By

Published : Dec 8, 2021, 8:30 PM IST

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत व श्रीमती मधुलिका रावत यांचे छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले, हे मनाला अजूनही पटत नाही असे म्हणत राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रावत आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना फेसबुक पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

Sambhaji Raje paid homage to General bipin Rawat
Sambhaji Raje paid homage to General bipin Rawat

कोल्हापूर - तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत व त्यांच्या पत्नीसह 12 लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत व श्रीमती मधुलिका रावत यांचे छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले, हे मनाला अजूनही पटत नाही असे म्हणत राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रावत आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना फेसबुक पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

Sambhaji Raje paid homage to General bipin Rawat
संभाजीराजे यांनी जनरल रावत यांच्या आठवणींनी दिला उजाळा

आज दुपारी बिपीन रावत त्यांची पत्नी आणि यांच्यासह 13 जणांचा तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यानंतर संभाजीराजेंनी अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

Sambhaji Raje paid homage to General bipin Rawat
संभाजीराजे यांनी जनरल रावत यांच्या आठवणींनी दिला उजाळा
काय म्हटले आहे संभाजीराजे यांनी -
2017 साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवास जनरल रावत मोठ्या अभिमानाने उपस्थित राहिले होते. 2019 साली पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात मदतकार्य राबविण्यासाठी मला त्यांचे खूप मोठे सहकार्य लाभले होते. छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर व अभिमान होता. मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट दिले होते, तेव्हा त्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता.
Sambhaji Raje paid homage to General bipin Rawat
संभाजीराजे यांनी जनरल रावत यांच्या आठवणींनी दिला उजाळा

दिल्ली येथील माझ्या निवासस्थानी ते आले असता ताराबाई महाराणीसहेबांचे तैलचित्र पाहून त्यांनी अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याबद्दल माहिती घेतली होती व युद्धशास्त्रात त्यांचा इतिहास शिकवला जावा, यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

Sambhaji Raje paid homage to General bipin Rawat
संभाजीराजे यांनी जनरल रावत यांच्या आठवणींनी दिला उजाळा
31 ऑक्टोबर 2018 रोजी रावत कोल्हापुरात -
संभाजीराजेंनी पुढे म्हटले आहे की, कोल्हापूर येथे लष्कराच्या कार्यक्रमास उपस्थित असताना मोठ्या आपुलकीने बिपीन रावत यांनी नवीन राजवाड्यास भेट देऊन छत्रपती घराण्याचा पाहुणचार स्वीकारला होता. जनरल रावत व त्यांच्या कुटुंबीयांशी आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते.

Sambhaji Raje paid homage to General bipin Rawat
संभाजीराजे यांनी जनरल रावत यांच्या आठवणींनी दिला उजाळा

त्यांच्या अशा आकस्मिक व धक्कादायी जाण्याने एक मित्र व मार्गदर्शक गमावल्याची खंत मनाला लागून राहिली आहे. शिवाय संपूर्ण राष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले असून जनरल रावत, श्रीमती मधुलिका रावत व त्यांच्यासोबतच्या अन्य मृतात्म्यास भावपूर्ण श्रध्दांजली असेही त्यांनी आपल्या पोस्ट मधून म्हटले आहे.

Sambhaji Raje paid homage to General bipin Rawat
संभाजीराजे यांनी जनरल रावत यांच्या आठवणींनी दिला उजाळा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.