ETV Bharat / state

RTPCR Report Compulsory : दोन्ही डोस घेतल्यानंतरही कर्नाटकात जाण्यासाठी आरटीपीसीआर अहवाल सक्तीचे

author img

By

Published : Nov 30, 2021, 7:01 PM IST

Updated : Nov 30, 2021, 8:09 PM IST

कर्नाटकात प्रवेश हवा ( Entry in Karnataka ) असल्यास आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह ( RTPCR Report Negative Compulsory ) असणे बंधनकारक आहे. त्यानुसार येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची येथील कोगनोळी टोल नाक्याच्या ( Kognoli toll Naka ) अलीकडे कर्नाटक हद्दीत तपासणी केली जात आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर तपासी करतांना पोलीस
महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर तपासी करतांना पोलीस

कोल्हापूर - कर्नाटकात प्रवेश हवा ( Entry in Karnataka ) असल्यास आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह ( RTPCR Report Negative Compulsory ) असणे बंधनकारक आहे. त्यानुसार येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची येथील कोगनोळी टोल नाक्याच्या ( Kognoli toll Naka ) अलीकडे कर्नाटक हद्दीत तपासणी केली जात आहे. अनेक प्रवाशांना नवीन नियमावली माहीत नसल्याने कर्नाटक पोलिसांसोबत ( Karnataka Police ) वादावादीचे प्रसंग सुद्धा घडत आहेत.

महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर तपासी करतांना पोलीस

कर्नाटक पोलिसांकडून कडक तपासणी

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे सर्वत्र कडक नियमावलीची अंमलबजावणी केली जात आहे. कर्नाटकच्या बेळगाव जिल्हा पोलीस विभागाने सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे. दोन दिवसांपासून येथील तपासणी नाक्यांवर अधिक कडक तपासणी केली जात आहे. प्रत्येक प्रवाशांकडे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र आणि 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र, असे दोन्ही असणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून तपासणी केली जात असून अनेकांकडे कागदपत्रांची पूर्तता झाली नाही, तर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात परत पाठवले जात आहे.

'आरटीपीसीआर रिपोर्ट सोबत ठेवा'

दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र आणि 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र नसेल तर कर्नाटकात सोडले जात नाही. जोपर्यंत शासनाकडून आदेश येत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीने कडक अंमलबजावणी सुरू राहणार असून प्रवाशांनी आपल्या आरटीपीसीआर रिपोर्ट जवळ ठेवावा, असे आवाहन सुद्धा कर्नाटक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - Omicron Corona new Variant : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated : Nov 30, 2021, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.