ETV Bharat / state

Raju Shetty: आधारला पॅन लिंकसाठी पैसे म्हणजे जनतेच्या पैशावर दरोडा, राजू शेट्टी आक्रमक

author img

By

Published : Apr 4, 2023, 4:01 PM IST

Updated : Apr 4, 2023, 5:15 PM IST

आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्यासाठी (दि. 30 जून)पर्यंत मुदत देण्यात आली आहे. (दि. 31 मार्च)पर्यंत शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली आहे. मात्र, आता प्रत्येकाला 1 हजार रुपये जिजीया कर आकारला जाणार आहे. याच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांनी आवाज उठवला असून, हा जिजीया कर आकारल्याने देशातील जनतेवर 44 हजार कोटीचा दरोडा पडणार असल्याचेही शेट्टी यांनी म्हंटले आहे.

Raju Shetty
Raju Shetty

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी

कोल्हापूर (जयसिंगपूर) : आयकर विभागाने देशातील 44 कोटीहून अधिक पॅन कार्ड ग्राहकांना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅन कार्ड धारकाकडून आधार लिंक करण्यापोटी 1 हजार रूपयाचा जिजीया कर आकारला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात सोशल मिडियाद्वारे व्यक्त होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, या करामध्ये अनेक लोक भरडले जाणार आहेत असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्यावर राजु शेट्टी यांनी थेट मैदानात उतरून यामध्ये लक्ष घातल्याने कार्यकर्त्यांनीही मोठी मोहीम हाती घेतली आहे.

केंद्र सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला : केंद्र सरकारने डिजीटल धोरणाच्या नावाखाली पॅनकार्ड धारक व्यक्तींनी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. सदरचा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅनकार्ड धारकास 1 हजार रूपये खर्च येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारून केंद्र सरकार तब्बल 44 हजार कोटी रूपयाचा दरोडा टाकत आहे. सध्या जनतेला कोणताही व्यवहार अथवा नोंदणी करत असताना आधार कार्ड व पॅन कार्ड असण बंधनकारक करण्यात आलेला आहे.

9 एप्रिल रोजी सोशल मीडियातून नागरिकांना व्यक्त होण्याचे आवाहन : केंद्र सरकार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात कराची आकारणी करून वाढलेल्या महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. यामुळे या तुघलकी धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याकरिता रविवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत #स्टॅापरॅाबरी #stoprobbary हा संदेश ट्वीटर, फेसबुक, इन्स्टांग्रामच्या माध्यमातून पाठवायचा आहे. तसेच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या nsitharaman@nic.in या मेल वरती सदर धोरणाविरोधात आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत असेही आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

हेही वाचा : Ghar Ghar Savarkar: आम्ही सारे सावरकर मोहिमेला 'घर घर सावरकर' मोहीमेतून ठाकरेंचे उत्तर

Last Updated : Apr 4, 2023, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.