ETV Bharat / state

कोल्हा'पूर' जलप्रकोप: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफसह लष्कर सज्ज, साडेअकरा हजार कुटुंबांचे स्थलांतर

author img

By

Published : Aug 7, 2019, 1:53 PM IST

एनडीआरएफ आणि लष्कराच्या टीमने पूरग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूरमध्ये पूरस्थिती

कोल्हापूर - जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज (बुधवारी) सकाळी नौसेनेच्या २ विमानातून एका बोटीसह २२ जणांचे पथक तसेच गोवा कोस्टगार्डच्या एक हेलीकॉप्टर बोटीसह दाखल झाले आहे. आज सकाळपासूनच एनडीआरएफ आणि लष्कराच्या टीमने बोटीद्वारे पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी अखेर जिल्ह्यातील २०४ गावांमधून ११ हजार ४३२ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.

कोल्हापूरमधील पूरस्थितीबद्दल माहिती देताना जिल्हाधिकारी दौलत देसाई

मंगळवारी रात्री लष्कराचे १ पथक २ बोटीसह तसेच एनडीआरएफचे आणखी १ पथक ४ बोटींसह शहरात दाखल झाले. परंतु, महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे अडचण निर्माण झाली. आज पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे ४ बोटींसह पथक रवाना झाले तर शहरासाठी दोन बोटींसह मदत देण्यास सुरुवात झाली. आज सकाळी नौसेनेच्या २ विमानांमधून एका बोटीसह २२ जणांचे पथक शहरात दाखल झाले. त्याचबरोबर गोवा कोस्टगार्डचे १ हेलिकॉप्टर एका बोटीसह दाखल झाले आहे. नौसेनेने आज पुन्हा १४ बोटी देण्याचे मान्य केले आहे. प्राधान्याने प्रयाग-चिखलीकडे मदत पाठविली असून आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टिंग सुरु करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये पूर्णत:, अंशत: पूरबाधित २०४ गावांचा समावेश आहे. मंगळवार अखेर या गावांमधून ११ हजार ४३२ कुटुंबांमधील ५१ हजार ७८५ व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तू विशेषत: अन्नाची पाकीटे देण्यात येणार आहेत. प्रशासन पूर्णपणे सतर्क आणि सज्ज आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.

महापुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या कामाला गती

महापुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या कामाला गती आली आहे. कोल्हापूरमध्ये १०६ जणांची लष्कराचे आणि एनडीआरएफची टीम कोल्हापूरात दाखल झाली आहे. येथील आंबेवाडी आणि चिखली गावातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आत्ताच एक पथक याठिकाणी दाखल झाले आहे. जवळपास २ हजारपेक्षा जास्त लोक या दोन्ही गावांमध्ये सध्या अडकून असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. २ दिवसांपासून याठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची टीम अविरतपणे कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने सुद्धा शेकडो लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या यांच्या मदतीला आता लष्कर, नौदल आणि कोस्टगार्डचे पथक सुद्धा दाखल झाले असून बचाव कार्याला गती आली आहे. सद्या आर्मीची एक बोट आत गावामध्ये पाठवण्यात आली आहे. अशा अजून काही बोटींच्या मदतीने या नागरिकांना बाहेर काढण्यात येणार आहे.

Intro:Body:

204 गावातून 11 हजार 432 कुटुंबांतील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर

 ; नौसेनेच्या दोन विमानातून 22 जणांचे पथक; गोवा कोस्टगार्डचे हेलीकॉप्टर एअरलिफ्टींगसाठी दाखल -जिल्हाधिकारी दौलत देसाई



कोल्हापूर  : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज सकाळी नौसेनेच्या दोन विमानातून एका बोटीसह 22 जणांचे पथक तसेच गोवा कोस्टगार्डच्या एक हेलीकॉप्टर बोटीसह दाखल झाले आहे. आज सकाळपासूनच एनडीआरएफ आणि लष्करांनी बोटीद्वारे पूर ग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. काल अखेर जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांनी आज दिली.  

काल रात्री लष्कराचे एक पथक दोन बोटीसह तसेच एनडीआरएफचे आणखी एक पथक चार बोटींसह शहरात दाखल झाले. परंतु महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे अडचण निर्माण झाली. आज पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे चार बोटींसह पथक रवाना झाले तर शहरासाठी दोन बोटींसह मदत देण्यास सुरुवात झाली. आज सकाळी नौसेनेच्या दोन विमानांमधून एका बोटीसह 22 जणांचे पथक शहरात दाखल झाले. त्याचबरोबर गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर एका बोटीसह दाखल झाले आहे. नौसेनेने आज पुन्हा 14 बोटी देण्याचे मान्य केले आहे. प्राधान्याने प्रयाग-चिखलीकडे मदत पाठविली असून आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टींग सुरु करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यामध्ये पूर्णत:, अंशत: पूरबाधीत अशा 204 गावांचा समावेश आहे. काल अखेर या गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांमधील 51 हजार 785 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तू विशेषत: अन्नाची पाकीटे देण्यात येणार आहेत. प्रशासन पूर्णपणे सतर्क आणि सज्ज आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

 


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.