ETV Bharat / state

मराठा आरक्षणप्रश्नी संघर्ष समितीची गोलमेज परिषद; सुरेशदादा पाटील यांची माहिती

author img

By

Published : Jun 21, 2021, 6:38 PM IST

Updated : Jun 21, 2021, 7:08 PM IST

एकीकडे मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. तर, दुसरीकडे आता मराठा आरक्षण संघर्ष समिती नवी मुंबईत गोलमेज परिषद घेणार आहे. येत्या 26 जून रोजी ही गोलमेज परिषद होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी दिली.

संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील
संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील

कोल्हापूर - एकीकडे मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. तर, दुसरीकडे आता मराठा आरक्षण संघर्ष समिती नवी मुंबईत गोलमेज परिषद घेणार आहे. येत्या 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिवशी गोलमेज परिषद होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी दिली. या परिषदेला मंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री नारायण राणे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. अशी माहितीही त्यांनी दिली. खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर जे निर्णय घेतले गेले त्यावर आम्ही समाधानी नसून, येत्या गोलमेज परिषदेमधून मराठा आरक्षणाबाबतचा लढा अधिक तीव्र करणार असल्याची माहितीही सुरेशदादा पाटील यांनी दिली.

गोलमेज परिषदेमध्ये खालील महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे

1) महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि ती फेटाळली तर सक्षम सुधारित याचिका दाखल करावी.
2) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळसाठी दोन हजार कोटींची तरतूद करावी.
3) सारथी संस्थेला दोन हजार कोटी निधी तात्काळ मंजूर करावा.
4) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिष्यवृत्ती योजना पूर्वी एसईबीसी विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली होती. त्याला शासनाने 600 कोटींची तरतूद केली आहे ती शिक्षण शुल्क ओबीसी प्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करावे.
5) पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पूर्वी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू होती त्यास 80 कोटींची तरतूद केली होती. त्यामध्ये वाढ करून, सदर योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करावी.
6) मराठा आरक्षणासाठी आंदोलनात बलिदान दिलेल्या वारसांना शासकीय सेवेमध्ये समावून घ्यावे.
7) मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात आजवर दाखल केलेले गुन्हे बिनशर्त तातडीने मागे घ्यावेत.
8) महाराष्ट्र शासनाने मेगा भरती स्थगित करावी.
9) कोपर्डी प्रकरणातील न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करावी.
10) राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करून, डागडुजी करण्यासाठी 500 कोटींची तरतूद येणाऱ्या आर्थिक वर्षात करावी.

Last Updated : Jun 21, 2021, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.