ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींचं मोठ वक्तव्य, म्हणाले मोदी...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 9:45 PM IST

Updated : Sep 12, 2023, 10:19 PM IST

Maratha Reservation : जोपर्यंत घटनादुरुस्ती होत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. तसंच मराठ्यांना आरक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात असं स्पष्ट मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केलंय.

Maratha Reservation
Maratha Reservation

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर Maratha Reservation : मराठा आरक्षण केवळ केंद्र सरकारच देऊ शकत. यासाठी राज्य सरकारनं पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तसंच मोदी यांना राज्य सरकारनं विषय समजावून सांगितला पाहिजे. घटनादुरुस्ती झाल्याशिवाय हा विषय सुटणार नाही, असं मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केलंय. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

आरक्षण फक्त मोदीच देऊ शकतात : सध्या राज्यात मराठा आरक्षणचा मुद्दा तापला असून राज्यभर आंदोलने सुरू आहेत. जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनीही सरकरानं निर्णय न घेतल्यास पुन्हा उपोषण सरु करण्याचा इशारा दिलाय. यासंदर्भात आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांनी आता आपलं मत व्यक्त केलंय. आरक्षणाचा प्रश्न राज्यापेक्षा दिल्लीत सोडवला पाहिजे. केंद्रात, राज्यात सध्या भाजपाची सत्ता आहे. यामुळं हा प्रश्न सुटू शकतो. तसंच हा प्रश्न केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारच सोडवू शकतात असा दावा त्यांनी केलाय.

50% आरक्षणाची मर्यादा वाढवा : राज्य सरकारनं पंतप्रधानांना विषय समजावून सांगून हा विषय संपवला पाहिजे. केंद्रात सध्या त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांच्याकडे ताकद आहे, त्यामुळं ते घटनादुरुस्ती करून निर्णय घेऊ शकतात, असं देखील शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलंय. 50% आरक्षणाची मर्यादा वाढवल्यास ओबीसी, मराठा आरक्षणाचा वाद राहणार नाही. तसंच सध्या तरी केंद्रात, राज्यात एकच सरकार आहे. पुढे एक वर्षानंतर निवडणुका झाल्यानंतर काय होईल हे सांगता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

आंदोलनाकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे होत : मनोज जरंगे पाटील यांचा जीव वाचवणे सरकारला अत्यंत गरजेचे आहे. सर्वात आधी तो वाचवण्यासाठी सरकारन प्रयत्न करणे महत्वाचे आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारने यापूर्वीच लक्ष द्यायला पाहिजे होते. सरकारनं लक्ष दिलं नसल्याने आंदोलकांवर लाठीमार झाला आणि त्यामुळेच विषय चिघळला आहे. असे ही शाहू महाराजांनी यावेळी म्हटले आहे.

उपोषण करून हा प्रश्न सुटणार नाही : शिवाय कोल्हापुरातील सकल मराठा समाजाकडून ही जर गणपती पूर्वी मार्ग निघाला नाही तर 2 ऑक्टोंबर पासून उपोषणास बसण्याचा इशारा दिला असून याबाबत ही शाहू महाराज भाष्य केलं असून पाठिंबा वगेरे ठीक आहे मात्र अश्या पध्दतीने उपोषण करून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाली तर त्यांनी कायदा बदलून हे करू शकतात असे शाहू महाराज छत्रपती म्हणाले आहेत.

हेही वाचा -

  1. Manoj Jarange News: एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा-मनोज जरांगे
  2. Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting: उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली? जयंत पाटील म्हणाले...
  3. Chitra Wagh on Uddhav Thackeray : ...म्हणून उद्धव ठाकरे यांना विदूषकाचा पोषाख भेट देणार-चित्रा वाघ
Last Updated : Sep 12, 2023, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.