ETV Bharat / state

Fish Died In Panchganga River पंचगंगा नदीत प्रदूषण, रासायनिक सांडपाणी पाण्यात मिसळल्याने हजारो माशांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 3, 2023, 6:16 PM IST

पंचगंगा नदीत केमीकलयुक्त पाणी सोडण्यात ( Pollution In Panchganga River At Kolhapur ) येत असल्याचा जबरदस्त फटका आता बसत आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा रंग हिरवट झाला असून मृत माशांचा पंचगंगा ( Fish Died Due To Pollution In Panchganga ) नदीत खच पडला आहे. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी ( Fish Died In Panchganga River ) पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत ग्रामस्थ संताप व्यक्त करत असून शिये गावाच्या सरपंच शीतल मच्छिंद्र मगदूम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करणार असल्याची माहिती दिली.

Fish Died Due To Pollution In Panchganga River
पंचगंगा नदीत मृत माशांचा खच

कोल्हापूर - पंचगंगा नदीच्या प्रदूषणात ( Pollution In Panchganga River At Kolhapur ) मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पंचगंगा नदी ही आता गटार गंगा झाली असून पंचगंगा नदीकाठावरील रासायनिक सांडपाणी पाण्यात मिसळल्यामुळे राजाराम बंधार्‍यापासून पुढे नदीचे पाणी हिरवेगार झाले आहे. पाण्याला प्रचंड दुर्गंधी देखील येत असून कसबा बावडा येथील शिये पूल परिसरातील नदी पात्रात अक्षरश मेलेल्या माशांचा खच पडलेला होता. हे सर्व मासे पंचगंगा नदीच्या प्रदूषणात ( Fish Died Due To Pollution In Panchganga ) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मृत्यूमुखी पडले आहेत. माशांना ऑक्सिजन न मिळाल्याने मासे अक्षरश: तडफडून मरत ( Fish Died In Panchganga River ) आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे मात्र अद्यापही लक्ष न गेल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा ( Pollution of Panchganga River ) प्रश्न ऐरणीवर येत असतो. परिसरातील कारखान्यामधून येणारे दूषित पाणी थेट नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. शिरोली पुलापर्यंत पंचगंगेच्या पाण्याचा रंग हिरवट झाला ( Panchganga water color turned green ) आहे. यंदा डिसेंबर महिन्यापासूनच पाणी प्रदूषणात वाढ होण्यास सुरुवात झाली. यामुळे राजाराम बंधार्‍यापासून खाली शिये पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासे पाण्यावर तरंगत आहेत. पाण्याच्या दुर्गंधीमुळे वाहनचालक नाक मुठीत धरून प्रवास करीत आहेत. शिये-बावडा पुलाखाली नदीतील मृत माशांचा खच लागला आहे.

ऑक्सिजन मिळत नसल्याने माशांचा तडफडून मृत्यू सोमवारी दुपारच्या सुमारास हे मासे ऑक्सिजन मिळत नसल्याकारणाने पाण्याच्या बाहेर येऊन श्वास घेण्यासाठी धडपडत होती. मात्र आता मासे मृत्यूमुखी पडत आहेत. हे दूषित पाण्यातील मासे नेण्यासाठी परिसरातील नागरिक येथे गर्दी करत आहेत. दरम्यान नदीच्या प्रदूषणामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे पाणी गावातील काही भागाला शुद्धीकरण करून पिण्यासाठी वापरले जाते. मात्र, आताचे प्रदूषण शुद्धीकरणाच्या पलीकडे गेले आहे. याबाबत प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांना ( Central Pollution Control Board ) पत्र लिहून प्रदूषणास जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे शिये गावच्या सरपंच शीतल मच्छिंद्र मगदूम यांनी सांगितले आहे.

या मुळे मासे पडले मृत्यूमुखी पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा हा खूप वर्षापासूनचा आहे. कारखान्यातून येणारे केमिकल युक्त पाणी ( Chemical water In Panchganga River ) प्रक्रिया न करता थेट नदीत सोडणे, शहरातील ड्रेनेज, गटारचे पाणी नदीत सोडणे, कपडे, गाड्या, म्हशी धुणे यामुळे नदी मोठ्या प्रमाणात दूषित झाली आहे. कोल्हापुरातील अनेक पर्यावरण प्रेमी पंचगंगा बचाव म्हणत लढा उभा करत असले, तरी दुसऱ्या बाजूला प्रदूषण नियत्रंण मंडळ विभाग झोपलेले आहे का हा प्रश्न निर्माण होत आहे. आज मृत्युमुखी पडलेल्या या माश्यांची पाहणी करण्यासाठी अद्याप कोणताही अधिकारी आले नसल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात आले. दरम्यान आता येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार असल्याची भीती निर्माण झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.