ETV Bharat / state

Kumbhi Sakhar Karkhana Election: कुंभी कासारीवर चंद्रदीप नरके ! सलग चौथ्यांदा कारखान्यावर सत्ता

author img

By

Published : Feb 15, 2023, 1:25 PM IST

kumbhi kasari election story
कुंभी कासारीवर चंद्रदीप

कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. यामध्ये पुन्हा एकदा मतदारांनी चंद्रदीप नरके यांच्या बाजूनेच कौल दिला आहे. नरके यांच्या पॅनेलने 23 पैकी 23 जागांवर विजय मिळवला आहे.

कुंभी कासारीवर चंद्रदीप नरके

कोल्हापूर: सलग चौथ्यांदा त्यांनी कारखान्यावर विजय मिळवला आहे. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडीने शेवटपर्यंत झुंज दिली. नरके यांच्या विरोधात आमदार पी.एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी संपूर्ण ताकद लावली होती. शिवाय गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके तसेच चेतन नरके यांनी विरोधी आघाडीचा थेट प्रचार केला होता. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र या अटीतटीच्या लढतीत चंद्रदीप नरके यांनी बाजी मारली आहे.

जस ठरले तसे केल्याचे मॅसेज व्हायरल: चंद्रदीप नरके यांना आमदार सतेज पाटील, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची ताकद मिळाल्याने ही लढाई काही प्रमाणात नरके यांच्यासाठी सोपी बनली होती. जसे ठरले तसेच केले अशा आशयाचे मॅसेज तसेच फोटो मतदानाच्या दिवशी पासुन सोशल मीडियावर फिरत होते. यामुळे पुन्हा एकदा सतेज पाटील यांचा आमचं ठरलंय पॅटर्नची चर्चा झाली असून त्याची चर्चा सुरू आहे. गेली 18 वर्षे कारखान्यावर माजी आमदार चंद्रदीप नरके यांची सत्ता होती. परंतु यंदा च्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी ताकद लावल्याने निवडणुकीत चुरसनिर्माण झाली होती.

नरके गटाची ताकद वाढली: अशातच गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी उघडपणे विरोधी आघाडीस पाठिंबा दिला होता. तर त्यांचे पुत्र चेतन नरके थेट प्रचारात उतरत प्रचार सुरू केला होता. गोकुळच्या राजकारणात चंद्रदीप नरके यांनी सतेज पाटील यांना साथ दिली. अरुण नरके हे सत्तेत असताना गोकुळ विरोधातील मोर्चात ते पुढे राहिले. त्याची परतफेड म्हणून पाटील यांनी नरके यांना पाठिंबा दिला. यामुळे रविवारी झालेल्या मतदानात जसं ठरलंय तसंच करतोय अश्याप्रकरचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. सतेज पाटील यांच्यासह गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांची ही साथ चंद्रदीप नरके यांना मिळाल्याने नरके गटाची ताकद वाढली. याचा प्रभाव विरोधकांवर पडू लागला. विरोधकांनी केलेल्या आरोपांना कोणतीही भीक न घालता मतदारांनी आपले मतदान नरके यांना देत आपला कौल विजयाच्या माध्यमातून दाखवून दिला. प्रचाराच्या काही दिवसांवरच सतेज पाटील यांनी नरके यांना पाठिंबा दिल्यामुळे सतेज पाटील यांचा आमचं ठरलंय पॅटर्न पुन्हा चर्चेत आला आहे.



निवडणुकीत 82.45 टक्के मतदान: कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रविवारी झालेल्या अत्यंत चुरशीने 82.45 टक्के मतदान पार पडले. काल मंगळवारी सकाळी मतमोजणीला रमणमळा इथल्या शासकीय धान्य गोदामात पार पडली. पहिली फेरी मतमोजणी व्हायला तब्बल 9 तासांचा अवधी लागला. मतमोजणी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास संपली. एकूण 35 टेबलवर प्रत्येकी 4 कर्मचारी असे एकूण 140 कर्मचारी मतमोजणी करत होते. तर 23 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्या विरोधात आमदार पी. एन. पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, आता सर्व निकाल हाती आले असून चंद्रदीप नरके यांना आपला गड शाबूत ठेवण्यात यश आले आहे. नरके पॅनलचे सर्व 23 उमेदवार 500 ते 3000 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. या मोठ्या विजयानंतर रात्री 12 च्या सुमारास चंद्रदीप नरके यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.


नरके गटाचे विजयी उमेदवार : विजयी उमेदवार अनिल पाटील, भगवंत पाटील, बाजीराव शेलार, राहुल खाडे, किशोर पाटील, दादासो लाड, उत्तम वरुटे, सर्जेराव हुजरे, विश्वास पाटील, सरदार पाटील, संजय पाटील, अनिष पाटील, प्रकाश पाटील, बळवंत पाटील, वसंत आळवेकर, प्रकाश पाटील, राऊ पाटील, विलास पाटील, धनश्री पाटील, प्रमिला पाटील, युवराज शिंदे, कृष्णात कांबळे.

हेही वाचा: Shiv Sena Agitation Warned शिवसेनेचा आंदोलनातून इशारा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपालांना बोलवू नका अन्यथा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.