ETV Bharat / state

Kolhapur ST Buses : कोल्हापुरातील एसटी बसेस; काय असते नियमित तपासणी? 'ईटीव्ही भारत'चा आढावा

author img

By

Published : Jul 18, 2022, 6:41 PM IST

आज सकाळी मध्यप्रदेशहुन जळगावकडे येत असलेल्या एसटी चा मोठा अपघात झाला. यामध्ये एसटी नदीमध्ये कोसळून जवळपास 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर नादुरुस्त एसटीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील (Kolhapur ST Buses) सीबीएस येथे एसटी ची दररोज कश्या पध्दतीने तपासणी केली जाते, एसटी ची दररोज कोणती दुरूस्तीची कामे निघतात, याबाबत 'ईटीव्ही भारत'च्या कोल्हापुर प्रतिनिधींनी आढावा घेतला आहे.

Kolhapur ST Bus
कोल्हापूर एसटी बस

कोल्हापूर : आज सकाळी मध्यप्रदेशहुन जळगावकडे येत असलेल्या एसटी चा मोठा अपघात झाला. यामध्ये एसटी नदीमध्ये कोसळून जवळपास 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर नादुरुस्त एसटीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील (Kolhapur ST Buses) सीबीएस येथे एसटी ची दररोज कश्या पध्दतीने तपासणी केली जाते, एसटी ची दररोज कोणती दुरूस्तीची कामे निघतात, याबाबत 'ईटीव्ही भारत'च्या कोल्हापुर प्रतिनिधींनी आढावा घेतला आहे.

एसटी च्या स्थिती बाबत आढावा घेतांना प्रतिनिधी



लांब पल्ल्याच्या एसटी ची दररोज तपासणी : दरम्यान, कोल्हापरात (Total 650 ST buses in Kolhapur) एकूण 650 एसटी असून, सध्यस्थितीत 600 एसटी बसेस रस्त्यावर धावत आहेत. यातील अनेक बसेस अतिशय सुस्थितीत असून, काही बसेस ची अवस्था मात्र दयनीय आहे. येथे सर्वच एसटी ची दररोज तपासणी होत असते. तपासणी केल्याशिवाय एकही एसटी डेपोमधून बाहेर पडत नाही, अशी माहिती इथल्या कर्मचाऱ्यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने ब्रेकची तपासणी नियमित केली जाते. शिवाय टायर आणि इंजिनची काही कामे असतील तर संबंधित ड्रायव्हरला विचारून तशी कामे केली जातात.


एसटी ड्रायव्हरच्या सीट ची दुरवस्था : दरम्यान, एसटी ड्रायव्हरची सीट महत्वाची असते. ड्रायव्हरच्या भरवशावर सर्व प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांची आसन व्यवस्था सुरळीत असणे अतिशय गरजेचे आहे. कोल्हापुरातल्या अनेक एसटीमध्ये ड्रायव्हर सीट चांगल्या स्थितीत आहेत. मात्र काहींच्या सीट ची अवस्था अतिशय दयनीय असल्याचे अनेक ड्रायव्हर नी सांगितले.




हेही वाचा: Maharashtra State ST Corporation: राज्यासह राज्याच्या बाहेर एसटीचा पसारा, तरीही एसटी उपेक्षित!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.