ETV Bharat / state

आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात कन्नड रक्षण वेदिका आक्रमक; सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-कर्नाटक सर्व बस रद्द

author img

By

Published : Dec 29, 2019, 7:59 AM IST

Updated : Dec 29, 2019, 12:10 PM IST

सीमा प्रश्नावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र-कर्नाटक सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा कन्नड रक्षण वेदिकेने दिला आहे.

bus
प्रातिनिधीक छायाचित्र

कोल्हापूर - कर्नाटक राज्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व बस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमा प्रश्नावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत. या वादात कन्नड रक्षण वेदिकेनेही गंभीर भूमीका घेतली आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा कन्नड रक्षण वेदिकेने दिला आहे.

कोल्हापूर-कर्नाटक सर्व बस रद्द

याशिवाय 'राजेश पाटील यांना बेळगावमध्ये पाय ठेवू देणार नाही', असेही कन्नड रक्षण वेदिकेने स्पष्ट केले आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर तणाव आणि नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचे निर्देशही पोलिसांनी परिवहन महामंडळाला दिले आहेत.

हेही वाचा - सीमा प्रश्नी भीमाशंकर पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर एन. डी. पाटील म्हणतात...

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील सीमा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांवर कानडी भाषा शिकण्याची केली जाणारी सक्ती तसेच, कर्नाटक सरकारने काही वर्षांपूर्वी बेळगावचे नाव बदलण्याचा घेतलेला निर्णय, या कारणांवरून एकिकरण समिती आणि कर्नाटक सरकारमध्ये कायम वाद सुरू असतात. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा पुतळा जळल्याच्या निषेधार्थ दुपारी बारा वाजता शिवसेनेकडून बस स्थानकापासून निषेध रॅली काढण्यात येणार आहे.

Intro:*कोल्हापूर big ब्रेकिंग*

कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून कोल्हापूरात येणाऱ्या सर्व बस रद्द


सीमा प्रश्नावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्री पासून सर्व बस रद्द

तणाव आणि नुकसान टाळण्यासाठी पोलिसांच्या आदेशाने सेवा रद्द

पुढील आदेश येई पर्यंत बस सेवा सुरू न करण्याचे दिले आदेश...

दुपारी बारा वाजता उद्धव ठाकरे यांचा पुतळा जळल्याच्या निषेधार्थ शिवसेनेची बस स्टॅण्ड पासून निषेध रॅलीBody:.Conclusion:.
Last Updated : Dec 29, 2019, 12:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.