ETV Bharat / state

KDDC Bank Election : ज्यांनी डावलण्याचा प्रयत्न केला त्यांना मतदारांचे प्रतुत्तर; बाबासाहेब पाटलांचा विनय कोरेंना टोला

author img

By

Published : Jan 7, 2022, 5:18 PM IST

Updated : Jan 7, 2022, 10:37 PM IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल हाती ( Kddc Bank Election Result ) आला आहे. यामध्ये बाबासाहेब पाटील यांचा विजय झाला आहे. विजयानंतर पाटील यांनी विनय कोरे यांना टोला ( Babasaheb Patil Critisized Vinay Kore ) लगावला आहे. तर विनय कोरे यांनी योग्यवेळी किंमत मोजावी लगेल असे म्हटले आहे.

balasaheb patil vinay kore
balasaheb patil vinay kore

कोल्हापूर - माझी उमेदवारी डावलण्यासाठी ज्यांनी आटापिटा केला त्यांना माझ्या मतदारांनी प्रत्युत्तर दिल्याचा टोला शिवसेना गटातून विजयी झालेले उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी विनय कोरे यांना ( Babasaheb Patil Critisized Vinay Kore ) लगावला. तसेच, आता आपण संजय मंडलिक यांच्यासोबत राहणार असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा ( Kddc Bank Election Result ) निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे ८ उमेदवार तर विरोधी गटातील ४ उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, आमदार विनय कोरे ( Mla Vinay Kore ) यांनी प्रतिष्ठेच्या ठरवलेल्या प्रक्रिया संस्था गटात विद्यमान संचालक व विरोधी पॅनेलचे प्रमुख खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik Win Kddc Bank Election )व बाबासाहेब पाटील ( Babasaheb Patil Win Kddc Bank Election ) मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत.

विजयानंतर नवनियुक्त संचालक बाबासाहेब पाटील प्रसारमाध्यमांना संवाद साधताना

या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, "माझी डावलण्यासाठी ज्यांनी आटापिटा केला त्यांना माझ्या मतदारांनी चपराक लगावली आहे. कोरे यांनी मला उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न केले होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले आहे. आता आपण संजय मंडलिक यांच्यासोबतच राहणार असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले."

योग्य वेळी किंमत मोजावी लागणार - कोरे

बाबासाहेब पाटील यांच्या विजय आमदार विनय कोरे ( Mla Vinay Kore On Kdcc Bank Election ) यांच्या जिव्हारी लागला असून, त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांना बोलताना कोरे यांनी म्हटलं की, "सत्ताधाऱ्यांमधील सर्वजण एकत्र यावे, अशी अपेक्षा होती. मात्र, माझ्या अपेक्षांना विश्वासघाताने सुरुंग लावला. ज्यांनी हे विश्वासघाताचे पाप केले त्यांना त्याची योग्य वेळी किंमत मोजावी लागले," असा इशारा त्यांनी सत्ताधारी आघाडीतील नेत्यांना दिला.

आमदार विनय कोरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

काय आहे प्रकरण?

आमदार विनय कोरे यांनी बाबासाहेब पाटील यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता. त्यानंतर बाबासाहेब पाटील पॅनेलमध्ये नसतील तर मीही तुमच्यासोबत नाही असा पवित्रा खासदार मंडलिक यांनी घेतला. कोरे यांच्या विरोधामुळे सत्तारूढ गटाने पाटील यांना वगळले तर जागा वाटपाच्या वादातून मंडलिकही बाहेर पडले. या दोघांनी प्रक्रिया संस्था गटातून विजय मिळवत या गटाचे आम्हीच शिलेदार असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे या दोघांचा विजय सत्तारुढ गटासाठी मोठा धक्का मानला जातो.

निवडणूक आलेले उमेदवार खालीलप्रमाणे -

विकास सेवा संस्था गट

आजरा : सत्ताधारी गटाचे सुधीर देसाई विजयी; विद्यमान संचालक अशोक चाराटी पराभूत

शाहूवाडी : रणवीरसिंह गायकवाड विजयी; विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरिडकर पराभूत

शिरोळ : राजेंद्र पाटील यद्रावकर विजयी; गणपतराव पाटील पराभूत

भुदरगड : सत्ताधारी गटाचे रणजित पाटील विजयी; यशवंत केरबा नांदेकर पराभूत

गडहिंग्लज : संतोष पाटील विजयी; अप्पी पाटील पराभूत

पन्हाळा : विनय कोरे

कृषी पनन गट

शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी; प्रदीप पाटील भुयेकर पराभूत

बाबासाहेब पाटील विजयी; मदन कारंडे पराभूत

नागरी बँक पतसंस्था गट

अर्जुन आबीटकर यांचा विजयी; आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव

इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गट

प्रताप उर्फ भैय्या माने विजयी; क्रांतीसिंह पवार पाटील पराभूत

इतर मागासवर्गीय गट

विजयसिंह माने विजयी; रवींद्र मडके पराभूत

हेही वाचा - Counting Of Votes Kolhapur District Bank : मतपेट्यांमधून नेत्यांना चिठ्ठ्या लिहून मतदारांकडून कानपिचक्या

Last Updated : Jan 7, 2022, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.