ETV Bharat / state

Border Dispute : कन्नड संघटनेविरोधात शिवसैनिक आक्रमक; कर्नाटकात प्रवेश करताना घेतले ताब्यात

author img

By

Published : Dec 6, 2022, 10:51 PM IST

महाराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने बेळगावच्या चन्नम्मा सर्कलमध्ये रॅली काढली होती. मात्र, राज्यातील विविध जिल्ह्यातून येणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांना प्रवेश रोखण्यासाठी हिरेबागेवाडी चेकपोस्टवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कर्नाटकात जाणाऱ्या शिवसैनिकांना यावेळी ताब्यात घेण्यात (Shiv Sena party workers detained) आले होते.

border dispute
border dispute

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाच्या (Maharashtra Karnataka Border Dispute) पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा याचा भडका उडण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या कर्नाटक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी आक्रमक होत कर्नाटक मध्ये घुसण्याचा प्रयत्न (Shiv Sena party workers detained) केला. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना येथील दुधगंगा नदीच्या पुलावरच ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचे दिसले.

शिवसैनिकांना घेतले ताब्यात

मराठी भाषिक नाराज : दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र दोन वेळा त्यांनी आपला दौरा रद्द केला. एकीकरण समितीने संपूर्ण तयारी केली होती तरीही मंत्र्यांनी दौरे रद्द केल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दोघांना प्रतिकात्मक बांगड्यांचा आहेर सुद्धा यावेळी दिला. यावेळी कन्नड संघटनेच्या विरोधात आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना कर्नाटकात जाण्याच्या पूर्वीच रोखून ताब्यात घेतले.


जशास तसे उत्तर देऊ : आज कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर जी दगडफेक केली आहे. त्याचा तीव्र शब्दात निषेध करत शिवसैनिकांनी कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांवर सुद्धा भगव्या रंगात जय महाराष्ट्र लिहून त्यांना पुढे पाठवल्या. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील शिवसैनिक सुद्धा आता या संतप्त प्रकरणानंतर आक्रमक होत असून आम्ही जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.

पोलिस बंदोबस्त तैनात: महाराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने बेळगावच्या चन्नम्मा सर्कलमध्ये रॅली काढली होती. मात्र, राज्यातील विविध जिल्ह्यातून येणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांना प्रवेश रोखण्यासाठी हिरेबागेवाडी चेकपोस्टवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कन्नड कार्यकर्त्यांचा प्रवेश रोखण्यासाठी दोन DCP, दोन ACP, चार CPI, 10 PSI, कर्नाटक राज्य राखीव पोलिस (KSRP) च्या 12 प्लाटून आणि सिटी सशस्त्र राखीव (CAR) च्या आठ प्लाटून चेक पोस्टवर तैनात आहेत. महाराष्ट्र राज्यातून बेळगावी जाणाऱ्या सर्व प्रवेश मार्गांवरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई येत्या काही दिवसांत कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.( Kannada Activists Disallowed Entry )

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.