ETV Bharat / state

कोल्हापुरात पुन्हा महापुराची शक्यता, पंचगंगा कोणत्याही क्षणी ओलांडणार इशारा पातळी

author img

By

Published : Sep 8, 2019, 10:54 AM IST

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरसह धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा कोणत्याही क्षणी इशारा पातळी ओलांडू शकते.

Kolhapur flood news

कोल्हापूर - राज्यात पावसाने थोड्या विश्रांतीनंतर पुनरागमन केले आहे. कोल्हापूरसह धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३८.७ फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे पंचगंगा कोणत्याही क्षणी राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ओलांडू शकते.

कोल्हापुरात पावसाचे पुनरागमन, पंचगंगा ओलांडणार इशारा पातळी

राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ३९ फूट आहे, तर धोका पातळी ४३ फूट आहे. सध्या बंधाऱ्याच्या पाच दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग चालू आहे. मध्यरात्री राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले गेले होते. पावसामुळे जिल्ह्यातील ६८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच, पंचगंगेचे पाणी पुन्हा शहरात जाण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत गायकवाड वाड्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची तीन पथके जिल्ह्यातील विविध ठिकाणी दाखल झाली आहेत.

दरम्यान, राधानगरी धरणातून ५,५४० क्युसेक, तुळशी धरणातून १,९५६ क्युसेक, कुंभी धरणातून १,८५० क्युसेक, कासारी धरणातून १,१०० क्युसेक, वारणा धरणातून १३,१५० क्युसेक तर दूधगंगा धरणातून १३,२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

हेही वाचा : स्मिता तांबेच्या गौराईच्या साडीसाठी आणलं कोल्हापूरवरून खणाचे कापड

Intro:*कोल्हापूर ब्रेकिंग*

कोणत्याही क्षणी पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडणार

पंचगंगा नदी पाणी पातळी 38.7 फुटांवर

राजाराम बंधाऱ्यांची इशारा पातळी आहे 39 फूट तर धोका पातळी आहे 43 फूट

कोल्हापूरसह धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम

एक आणि दोन नंबरचे दरवाजे बंद

सध्या 5 दरवाजातून विसर्ग सुरु

मध्यरात्री राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले होते

जिल्ह्यातील 68 बंधारे गेले पाण्याखाली

पंचगंगा नदीचे पाणी पुन्हा एकदा शहरात पोहोचल

गायकवाड वाड्याच्या पुढे पुराचे पाणी

आंबा तिलारी गगनबावडा भागात रात्रभर अतिवृष्टी

NDRF ची 3 पथक कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात दाखल


राजाराम बंधारा (इशारा पातळी 39 फूट, धोका पातळी 43 फूट)
सद्याची पाणी पातळी 38 फुट 5 इंच, विसर्ग 49635 क्युसेक्स.

विसर्ग माहिती
१)राधानगरी धरण - विसर्ग 8540 क्युसेक
२)तुळसी धरण - विसर्ग - 1956 क्युसेक
३) कुंभी धरण- विसर्ग-1850 क्युसेक्
४) कासारी धरण - विसर्ग-1100 क्युसेक
एकूण पंचगंगा खोरे - 13446 क्युसेक
५) वारणा धरण - विसर्ग - 13150 क्युसेक
६) दुधगंगा - विसर्ग-13200 cusecsBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.