ETV Bharat / state

जिओच्या बाबतीत जे झालं तेच बाजार समित्यांबाबत होणार; त्याची सुरुवात झालीय - शेट्टी

author img

By

Published : Dec 16, 2020, 6:48 AM IST

Updated : Dec 16, 2020, 8:33 AM IST

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी

कोल्हापूर - जिओच्या बाबतीत जे झाले तेच बाजार समित्यांबाबत होणार आहे आणि आता त्याची सुरुवात झाली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे. शेतकऱ्यांनी कृषी कायदे आपल्या विरोधातील आहेत, हे चांगले ओळखले आहे. त्यामुळे करेंगे या मरेंगे या उद्देशानेच हे सर्वजण आंदोलनात उतरले असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजू शेट्टी दिल्लीमध्ये गेले होते. या आंदोलनाची माहिती देण्याबाबत आणि एकूणच परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी कोल्हापूरात आयोजन पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
दिल्लीतील आंदोलनाला भाजपकडून जातीय, प्रांतिय रंग देण्याचा प्रयत्न - एकिकडे शेतकऱ्यांसोबत चर्चा करायची तर दुसरीकडे वेगवेगळ्या पद्धतीने फूट पाडायचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. त्याला जातीय, प्रांतीय रंग देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांना पाकिस्तानी, नक्षलवादी, खलिस्तानवादी असे सगळे म्हणून झाले तरी शेतकरी आजही आपल्या मुद्द्यावर ठाम असल्याचे राजु शेट्टी यांनी यावेळी सांगितले. शिवाय करेंगे या मरेंगे या उद्देशानेच सर्वजण या आंदोलनात सहभागी झाले असल्याचंही त्यांनी म्हंटले. म्हणून तेंव्हा पंजाब धगधगता राहिला - चाळीस वर्षांपूर्वी असाच शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न निर्माण झाला होता. तत्कालीन केंद्र सरकार आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तो नीट समजावून घेतला नाही. त्यामुळे काही असामाजिक तत्वांच्या आणि खलिस्तानवाद्यांच्या हाती शेतकऱ्यांची मुलं गेली. म्हणूनच पुढे काही वर्षे पंजाब धगधगत राहिला. यामध्ये तत्कालीन पंतप्रधानांना सुद्धा पद गमवावे लागले असल्याच्या इतिहासही शेट्टींनी यावेळी सांगितला.पंतप्रधान कोणाचेच ऐकत नाहीत - शेतकऱ्यांच्या या आंदोलनाबाबत पंजाब हरियाणा बरोबरच देशभरातील शेतकऱ्यांकडून आता विरोध होत आहे. त्यामुळे अनेक प्रमुख नेते राष्ट्रपतींना भेटले आहेत. शरद पवार सुद्धा पंतप्रधानांना न भेटात राष्ट्रपतींना भेटून त्यांनी त्याअर्थी या देशाचे पंतप्रधान कोणाचेच ऐकत नाहीयेत, अशी टीका सुद्धा शेट्टींनी केली. देशाचा जीडीपी पुन्हा रुळावर आणायला प्रयत्न करा - सद्या देशाचा जीडीपी हा पूर्णपणे ढासळला आहे. ते सुधारण्यावर भर देणे गरजेचे आहे. केवळ कृषी क्षेत्रातील जीडीपी अतिशय चांगला आहे. मात्र सरकार त्याच शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे आणत आहे. शेतकऱ्यांचे भले व्हावे, अशी सरकारची प्रामाणिक भूमिका असेल तर नवीन कायदे रद्द करावेत. शिवाय शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या फायदाचा कायदा घेऊन यावा, असेही ते यावेळी म्हणाले.शेट्टींचा दानवेंना टोला - कायम चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीची वक्तव्य करणारे दानवे यांना मत देणाऱ्या शेतकऱ्यांनाही आपण योग्य माणसाला मत दिले आहे का? असा सवालही शेट्टी यांनी केला. शिवाय एका पत्रकार परिषदेतून ते आपल्या वक्तव्यावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात असल्याचे म्हणत आहेत. यावर शेट्टींनी चीनकडून दानवे यांना धमकी आली असावी म्हणून ते पत्रकार परिषदेतून निघून गेले असतील, असा उपहासात्मक टोला लगावला.
Last Updated : Dec 16, 2020, 8:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.