ETV Bharat / state

राष्ट्रीय महामार्ग रोखला; राजू शेट्टींसह तब्बल अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 7:10 PM IST

FIR Against Raju Shetty
राजू शेट्टी

FIR Against Raju Shetty : साखर कारखानदारांकडून ऊसाला रास्त भाव मिळावा यासाठी काल (गुरुवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात तब्बल नऊ तास पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला होता. (Pune Bangalore National Highway) याविषयी पोलीस प्रशासनानं राजू शेट्टी यांच्यासह अडीच हजार अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (Swabhimani Shetkari Sanghatana Agitation)

कोल्हापूर FIR Against Raju Shetty : मागील हंगामातील ऊसाला १०० रुपये तसंच चालू हंगामातील तुटणाऱ्या ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काल (गुरुवारी) तब्बल नऊ तास पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला होता. यामुळे आता संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आणि तब्बल अडीच हजार अज्ञातांवर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Sugarcane Price Hike Agitation)

प्रवाशांना झाला आंदोलनाचा त्रास : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस आंदोलन सुरू होतं. काल राजू शेट्टी यांनी पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखत आंदोलनाची तीव्रता वाढवली. चार बैठका निष्फळ ठरल्यानंतर त्यांनी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा इशारा सरकारला दिला होता. त्यानुसार काल राजू शेट्टी यांनी हा महामार्ग सकाळी ११च्या सुमारास अडवला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर शहरातील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेलं हे आंदोलन रात्री ८च्या सुमारास निर्णय आल्यानंतर तब्बल ९ तासांनी संपलं. दरम्यान या नऊ तासात प्रवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह तब्बल अडीच हजार कार्यकर्त्यांवर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'या' मुख्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल : ठाणे अंमलदार कांबळे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. जिल्ह्यात पाच किंवा पाचहून अधिक लोक एकत्र येण्यास, मिरवणूक काढण्यास, सभा घेण्यास, जिल्ह्यामध्ये बंदी आदेश आहे. तरी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अडवून धरण्यात आला. या प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम पाटील, अरुण माळी, राहुल पाटील, जनार्दन पाटील, स्वस्तिक पाटील, अशोक ऐतवडे, शरद पाटील, बंडू पाटील, सागर मादनाईक, अजित पोवार, शाहरुख पेंढारी, अनिल चव्हाण यांच्यासह सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

  1. तुषार दोशींच्या नियुक्तीवरुन सरकारमध्ये जुंपली; मतभेद पुन्हा चव्हाट्यावर
  2. साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींचं दान; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये साई संस्थानला मिळालं 17 कोटी 50 लाखांचं दान
  3. नामांकित शाळांचे आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचे राखीव 226 कोटींचे अनुदान रोखले, सरकार म्हणतं कोरोना काळात काय शिक्षण दिलं?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.