ETV Bharat / state

KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा उद्या निकाल.. कुणाची होणार सरशी, अंदाजबांधणी सुरु

author img

By

Published : Jan 6, 2022, 7:23 PM IST

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा उद्या निकाल
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा उद्या निकाल

अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा ( KDCC Bank Election 2022 ) निकाल उद्या ( दि. ७) लागणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी त्यांची सत्ता राखणार की, विरोधक डाव उलटून टाकणार याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. त्यामुळे निकालाबाबत ( KDCC Bank Election Result ) उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीसाठी ९८ टक्के मतदान ( KDCC Bank Voting ) झाले असून, सकाळी मतमोजणी ( KDCC Bank Vote Counting ) होणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ( KDCC Bank Election 2022 ) काल इर्षेने 98 टक्के इतके मतदान ( KDCC Bank Voting ) झाले. उद्या शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार ( KDCC Bank Vote Counting ) आहे. येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे ही मतमोजणी होणार असून, त्याची सर्व तयारी झाली आहे. एकूण 15 जागांसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष म्हणजे प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीत धक्कादायक निकाल ( KDCC Bank Election Result ) लागतील अशी शक्यता आहे.

इतके झाले मतदान

कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी एकूण 7 हजार 651 इतके मतदान होते. त्यापैकी 98 टक्के म्हणजेच 7 हजार 498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 21 जागांपैकी 6 जागा बिनविरोध झाल्या असून, 15 जागांसाठी ही निवडणूक लागली होती. एकूण 33 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे आता मतदार कोणाला कौल देणार आहे, हे उद्याच समजणार आहे. दरम्यान, काल मतदान झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांनी सुद्धा मतदानाचा आढावा घेऊन आकडेमोड करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार अनेकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

अशी आहे परिस्थिती

कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस,जनसुराज्य आणि राज्यातील विरोधी पक्ष असणारा भाजप यांनी एकत्र येत राजर्षी शाहू विकास आघाडी करून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेना, शेकाप आणि मित्रपक्ष यांनी राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी करून सत्ताधारी नेत्यांसमोर आव्हान निर्माण केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.