ETV Bharat / state

CM Eknath Shinde in Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'दबक्या पावला'नं कोल्हापुरात, दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 8:45 PM IST

Updated : Oct 28, 2023, 9:25 PM IST

CM Eknath Shinde in Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. गोकूळ शिरगाव येथील कणेरी मठात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात आले होते. मात्र, त्यांचा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा गुप्त ठेवला असल्याची चर्चा आहे.

CM Kolhapur Visit
CM Kolhapur Visit

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात

कोल्हापूर CM Eknath Shinde in Kolhapur : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सायंकाळी कोल्हापुरात दाखल झाले होते. कणेरी मठ येथील गो शाळेच्या आयव्हीएफ केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. मात्र, या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यभर तापला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना रोखण्याचा प्रयत्न झाल्यानं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गुप्तता ठेवली होती. कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांचा हा खासगी दौरा असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, कणेरी मठावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नेत्यांना गावबंदी : मराठा आरक्षण आंदोलनामुळं नेत्यांना गावात बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री अचानक कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र, मीडियालाही यावेळी पोलिसांनी बंदी घातली होती. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र, माध्यमांना याची माहिती मिळताच पोलिसांनी चित्रीकरण थांबवलं होतं.

मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनलाय. मराठा आरक्षण उपसमितीची तातडीची बैठक मुंबईत बोलावण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरच्या कणेरी मठावर दाखल झाले होते. मात्र, राज्यातील विविध गावांच्या मराठा आरक्षणाच्या गावबंदीच्या निर्णयाला राजकीय नेत्यांकडून ठिकठिकाणी विरोध केला जात आहे. कल्याणमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमाला मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत पोलिसांसह प्रशासनानं कमालीची गुप्तता पाळल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा -

  1. Manoj Jarange Patil : जरांगेंच्या उपोषणाची धग पोलीस दलापर्यंत; पोलिसांनी दिला राजीनामा...
  2. Sharad Pawar : 'पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर सरकार गोंधळलेलं, भारतानं इस्रायलला कधीच पाठिंबा दिला नव्हता'; शरद पवारांची टीका
  3. Devendra Fadnavis : भाजपाच्या हँडलवर मी पुन्हा येणार असा व्हिडिओ टाकणे शुद्ध वेडेपणा; देवेंद्र फडणवीस यांची सारवासारव
Last Updated : Oct 28, 2023, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.