ETV Bharat / state

Swabhimani Chakkajaam Andolan : कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वाभिमानीचे चक्काजाम आंदोलन

author img

By

Published : Feb 22, 2023, 6:21 PM IST

Swabhimani Chakkajaam Andolan
स्वाभिमानीचे चक्काजाम आंदोलन

सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव ( ता. शिरोळ ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ऊस तोडणी मुकादमकडून होणारी फसवणूक थांबवावी, एकरकमी एफआरपी , शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या , किमान हमीभावाचा कायदा लागू करा, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आदी मागण्या करत कार्यकर्त्यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

स्वाभिमानीचे चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर : केंद्र, राज्य सरकारने शेतकरी प्रश्नावर सरकारने ठोस भूमिका घ्यावी. वीज तोडणी, ऊस तोडणी मुकादमकडून होणारी फसवणूक थांबवावी, एकरकमी एफआरपी , शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या , किमान हमीभावाचा कायदा लागू करा, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, पिकविमा तातडीने खात्यावर जमा करा, नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये द्यावी अशी मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

Chakkajam movement
स्वाभिमानीचे चक्काजाम आंदोलन

चेकनाक्यावर आंदोलन : सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. कोल्हापूरात सुद्धा विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. महाराष्ट्रात सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. यात शेतकर्‍यांचे प्रश्न बाजूला राहिले आहे. जे सत्तेत आहेत ते मजेत आहेत. जे विरोधात आहेत ते शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे.

शेतकर्‍याला तुटपुंची मदत : अडचणीत असलेल्या शेतकर्‍याला तुटपुंची मदत जाहिर केली जाते, तीही वेळेवर मिळत नाही. पीक विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत, असा आरोप संघटनेने केला आहे. पीक विमा कंपन्यांनी हजारो कोटींचा नफा मिळवला. ज्या शेतकर्‍यांनी विम्याचे पैसे भरले आहेत त्यांना मात्र उन्हातान्हात उभी राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकर्‍यांसाठी आहे की कार्पोरेट कंपन्यांना डल्ला मारण्यासाठी?, असा सवालही शेतकरी संघटनेने उपस्थित केला.


वाहनांच्या रांगा : बुधवारी शेतकरी संघटनेने साडे अकराच्या सुमारास कोल्हापूरातील विविध ठिकाणी मुख्य मार्ग रोखले. यावेळी वीज तोडणी, ऊस तोडणी मुकादमकडून होणारी फसवणूक थांबवावी, एकरकमी एफआरपी, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, किमान हमीभावाचा कायदा लागू करा, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, पिकविमा तातडीने खात्यावर जमा करा अश्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे. वीज आमच्या हक्काची, शेतकर्‍यांची वीज तोडू नका, जाहीर केलेले 50 हजार रुपये द्या, यासह विविध मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या चक्का जाम आंदोलनामुळे विविध मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा - Regular Salary Of ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनाची हमी, एसटी आजारीच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.