ETV Bharat / state

धारधार शस्त्राने तरुणाची निर्घृण हत्या; कोल्हापुरातील इचलकरंजीमधील घटना

author img

By

Published : Jan 30, 2021, 12:54 PM IST

Updated : Jan 30, 2021, 1:26 PM IST

इचलकरंजी परिसरात शुभम दीपक कुडाळकर नावाच्या तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. शहापूर येथील विनायक हायस्कूलच्या मागच्या पटांगणावर धारदार शस्त्राने वार करून शुभमचा खून करण्यात आला.

तरुणाची निर्घृण हत्या
तरुणाची निर्घृण हत्या

कोल्हापूर - इचलकरंजी परिसरात खुनाची घटना ताजी असतानाच आणखी एकाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. शुभम दीपक कुडाळकर असे खून झालेल्या २६ वर्षीय तरुणाचे नाव आहे. शहापूर येथील विनायक हायस्कूलच्या मागच्या पटांगणावर धारदार शस्त्राने वार करून शुभमचा खून करण्यात आला.

एक महिन्यापूर्वी झाला होता प्रेमविवाह

मिळालेल्या माहितीनुसार शुभम कुडाळकर याचा एक महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. इचलकरंजीमधील पार्वती औद्योगिक वसाहत येथे तो नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे तो मंगळवार पेठेतील आपल्या घरातून कामावर गेला होता. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास विनायक हायस्कूलच्या मागील बाजूस असणाऱ्या पटांगणावर रक्ताचा थारोळ्यात पडलेला तरुण एका व्यक्तीला नजरेस पडला. त्या व्यक्तीने हा सगळा प्रकार पोलिसांना कळवला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत शुभमच्या चेहऱ्यावर, डोक्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार केले होते.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बी. बी. महामुनी, शहापूर पोलीस निरीक्षक प्रकाश निकम यांनी पोहोचून माहिती घेतली. दरम्यान, खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र एक महिन्यापूर्वीच शुभमचा प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे खुनामागे प्रेम प्रकरणाचे कारण असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

इचलकरंजीमध्ये काही दिवसांपूर्वी कबनुरमधील संदीप मागाडे याची देखील हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी घटना घडली असल्याने खळबळ माजली आहे.
हेही वाचा - डॉक्टर असल्याची खोटी माहिती सांगून घेतली कोरोना लस

Last Updated : Jan 30, 2021, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.