ETV Bharat / state

Ajit Pawar Sabha Kolhapur: कोल्हापुरात अजित पवार यांच्या उत्तरदायित्व सभेची जय्यत तयारी; मंत्री हसन मुश्रीफांचं शक्तिप्रदर्शन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 6:38 PM IST

Ajit Pawar Sabha Kolhapur
अजित पवारांच्या सभेची तयारी

Ajit Pawar Sabha Kolhapur : कोल्हापुरात उद्या अजित पवार यांची उत्तरदायित्व सभा पार पडणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आलीय. मंत्री हसन मुश्रीफ हे शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

अजित पवारांच्या सभेची तयारी

कोल्हापूर Ajit Pawar Sabha Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची स्वाभिमान सभा झाली. या सभेत थोरल्या पवारांनी मंत्री मुश्रीफांसह फुटीर नेत्यांवर निशाणा साधत सभा गाजवली होती. तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उत्तरदायित्व सभेतून शरद पवारांच्या टीकेला उत्तर मिळणार का? याकडं राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय. उद्या होणाऱ्या या सभेची तयारी पूर्ण झालीय. सुमारे लाखाहून अधिक लोक सभेला जमतील, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif Power show) यांनी व्यक्त केलाय.

राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं : रविवारी 10 सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापुरातील तपोवन मैदानावर जाहीर उत्तरदायित्व सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येवला नाशिकनंतर कोल्हापुरात 25 ऑगस्ट रोजी जाहीर सभा घेऊन होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी चाचपणी केलीय. दसरा चौकात झालेल्या जाहीर सभेत मंत्री मुश्रीफ यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा संदर्भ देत, मंत्री मुश्रीफांच्या पत्नीनं धाडस दाखवलं. मात्र, मुश्रीफांनी भाजपाच्या सत्तेचा आसरा घेत राष्ट्रवादीतून फुटलेल्या अजित पवार गटाची साथ देत वेगळा रस्ता धरला, यावर शरद पवारांनी आसूड ओढला होता. आता उत्तरदायित्व सभेच्या निमित्तानं मंत्री मुश्रीफ यांच्यासह फुटीर नेत्यांवर झालेल्या टीकेला या सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देतात का? याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. (Ajit Pawar Sabha Kolhapur Preparation)

एक लाखाहून अधिक लोक जमतील : कोल्हापुरातील तपोवन मैदानावर रविवारी सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या सभेला जिल्ह्यातील कागल, चंदगड, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा, शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले यासह सर्वच तालुक्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते जमणार आहेत. सुमारे एक लाखाहून अधिक लोक अजित पवारांच्या उत्तरदायित्व सभेसाठी जमतील, असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. (Ajit Pawar Sabha)

हेही वाचा :

  1. Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयात टिकेल असं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न - अजित पवार
  2. Maratha Morcha Baramati: अजित पवारांचा पेच आणखीनच वाढला; सरकारमधून बाहेर पडण्याचं बारामतीकरांचं आवाहन
  3. Maratha Andolan: अजित पवार सभेसाठी कोल्हापुरात आल्यास उद्रेक, सकल मराठा समाजाचा इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.