ETV Bharat / state

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयात टिकेल असं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न - अजित पवार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 3:58 PM IST

Ajit Pawar
अजित पवार

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. या संदर्भात तज्ञाचं मत विचारात घेऊन आरक्षण देण्यात येईल असं देखील पवार म्हणाले. ते आज पुण्यात प्रसारमाध्यामांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते.

अजित पवार यांची प्रतिक्रिया

पुणे Maratha Reservation : मराठा तसंच धनगर आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात गाजतोय. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रतिक्रिया दिलीय. महाविकास आघाडीच्या काळात दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं या संदर्भात जाणकारांचं मत विचारात घेऊन राज्य सरकार आरक्षण देण्याचा प्रयत्न करेल असं त्यांनी म्हटलं आहे. यावर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिलीय.

सरकारचे प्रयत्न सुरू : पुण्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमासाठी अजित पवार आज शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणासंदर्भात आपलं मत व्यक्त केलयं. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात सुरू आहे. त्यांच्याशी राज्य सरकार सतत संपर्कात आहे. त्यांच्याशी चर्चा करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आत्तापर्यंत आद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही असं पवार यावेळी म्हणाले. सरकार मराठा आरक्षणावर काम करत आहे. काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला बहुतांश मंत्री उपस्थित होते. मात्र, मी शहराबाहेर असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, अशी महिती अजित पवार यांनी दिलीय.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, आता हवामान खात्यानं पाऊस चांगला पडणार असल्याचं सांगितलं आहे. पुणे शहरालगत असलेल्या त्या धरणांमध्ये पाणीसाठा वाढला असून आणखी पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सरकारही यावर पूर्ण लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं अजित पवार म्हणाले.

शैक्षणिक धोरण सुधारलं पाहिजं : मराठी शाळा, इंग्रजी शाळा असा नुसताच भेदभाव करण्यापेक्षा राज्यातील शैक्षणिक धोरण सुधारलं पाहिजं, असं मला वाटतं. जे मराठी शाळेसाठी आंदोलन करतात, त्यांची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळात शिकतात, असा टोला त्यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला आहे. आपण बदल स्वीकारला पाहिजे. मराठी शाळात देखील उत्तम इंग्रजीचं शिक्षण मिळत असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मराठा-ओबीसी वाद पेटणार; 11 सप्टेंबरपासून ओबीसी समाजाचं आमरण उपोषण
  2. Congress Leader Join Shiv Sena : राजस्थानात शिंदेच्या गळाला लागला मोठा मासा, कॉंग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
  3. Maratha Reservation : ...तर दुसरं मणिपूर महाराष्ट्रात होईल, सरकारनं योग्य भूमिका घ्यावी ; ओबीसी जनमोर्चाचा इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.